सध्या क्रिकेटविश्वातील सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या नावावर आहेत. विराटने अलीकडेच आशिया चषक 2023 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 47वे वनडे शतक ठोकले. हे त्याचे 77वे आंतरराष्ट्रीय शतक होते. विराटने नाबाद 122 धावांचा पाऊस पाडत हा पराक्रम गाजवला. विशेष म्हणजे, यावेळी विराटने सर्वात वेगवान 13 हजार वनडे धावाही करण्याचा विक्रम केला. याबाबतीत त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर यालाही पछाडले. विराटने 267, तर सचिनने 321 डावांमध्ये हा विक्रम केला होता.
अशात 34 वर्षीय विराट कोहली (Virat Kohli) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा आणखी एक मोठा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. हा विक्रम वनडेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा आहे. सचिनने वनडेत 49 शतके ठोकली आहेत. सचिनला मागे सोडण्यासाठी विराटला आगामी दिवसात 3 शतके ठोकण्याची गरज आहे. सचिनने त्याच्या कारकीर्दीत 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. अशात पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज वेगवान गोलंदाज वकार युवूस याने विराटविषयी मोठे भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, विराटची कारकीर्द जेव्हा संपेल, तेव्हा त्याच्या खात्यात एवढी शतके असतील, ज्याचा लोकांनी अंदाजही लावला नसेल.
काय म्हणाला युनूस?
वकार युनूसने ही विचित्र भविष्यवाणी विराटच्या 77व्या आंतरराष्ट्रीय शतकानंतर केली. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना युनूस म्हणाला, “विराट, इतर खेळाडू आणि सचिन तेंडुलकरमध्येही अंतर आहे. जेव्हा सचिनची कारकीर्द संपली, तेव्हा त्याच्या नावावर 49 शतके होती. मी हे वचन देऊ शकतो की, विराटची क्रिकेट कारकीर्द संपण्यास अजून खूप काळ आहे. विराट खूप जास्त शतके करेल, ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही.”
लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, सचिनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ही 24 वर्षांची राहिली होती. तो 1989 ते 2013पर्यंत खेळला आणि फलंदाजीचे अनेक महाविक्रम आपल्या नावावर केले. तो कसोटी (15921) आणि वनडे (18426) क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच, विराटने 2008मध्ये पदार्पण केले आहे. तसेच, त्याने अनेक विक्रमही मोडले आहेत. मात्र, विराट कसोटीतील शतकांच्या बाबतीत सचिनपेक्षा खूप मागे आहे. विराटने आतापर्यंत 29 शतके झळकावली आहेत. तसेच, सचिनच्या नावावर या क्रिकेट प्रकारात 51 शतके आहेत. (waqar younis strange prediction about virat kohli said he will end up with a lot more centuries than anybody can think read)
हेही वाचा-
‘नसीम शाहला गमावणे मोठा झटका’, प्रमुख गोलंदाज बाहेर पडताच पाकिस्तानी कोचच्या वाढल्या चिंता
बोंबला! बाबरसेनेवर भडकली पाकिस्तानी अभिनेत्री, FIR करणार दाखल; आख्ख्या संघाला दिली खुली धमकी, पण का?