---Advertisement---

मोठी बातमी ! क्षेत्ररक्षण करताना ‘डेव्हिड वॉर्नर’ला गंभीर दुखापत, मैदानाबाहेर जावं लागल्याने संघ चिंतेत

On: रविवार, नोव्हेंबर 29, 2020 2:35 PM
---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर रविवारी(२९ नोव्हेंबर) दुसरा वनडे सामना झाला. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडणे भाग पडले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून क्षेत्ररक्षण करताना चौथ्या षटकात शिखर धवनने मारलेला चेंडू आडवण्याच्या प्रयत्नात वॉर्नरच्या मांडीच्या स्नायूंमध्ये ताण आला. यावेळी तो वेदनेने कळवळताना दिसला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाची मेडिकल टीम मैदानावर आली होती. त्यांनी लगेचच वॉर्नरला आधार देत मैदानाबाहेर नेले.

वॉर्नरची वेदना पाहून समालोचन करत असलेला ऍडम गिलख्रिस्ट म्हणाला, ‘ या दुखापतीतून सावरायला बराच वेळ लागू शकतो.’

वॉर्नरने आत्तापर्यंत या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने दुसऱ्या वनडे सामन्यात ८३ धावांची खेळी केली. तर पहिल्या वनडेतही त्याने ६९ धावांची खेळी केली होती. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरची दुखापत ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का ठरु शकते.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताविरुद्ध ५ वे शतक ठोकणाऱ्या स्मिथचे सचिन, पाँटिंगसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान

संकटमोचक पांड्या ! शतकवीर स्मिथला तंबूत धाडत हार्दिकचे जोरदार पुनरागमन

भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---