---Advertisement---

वॉर्नर ‘आऊट’ की ‘नॉट आऊट’? नक्की काय आहे वाद 

On: शनिवार, नोव्हेंबर 7, 2020 3:11 PM
---Advertisement---

आयपीएल 2020 च्या ‘प्ले ऑफ’ मधील एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 6 विकेट्सने पराभव केला. पण या सामन्यादरम्यान हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला तिसऱ्या पंचाने बाद घोषित केल्याच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. वॉर्नर बाद होता की नाबाद होता याबद्दल चर्चा सुरु आहे.

नक्की काय झाला वाद?

झाले असे की बेंगलोरने दिलेल्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर अतिशय सावधपणे खेळी करत होता. पण 6 व्या षटकात मोहम्मद सिराजने फेकलेला चेंडू वॉर्नरच्या ग्लव्ह्ज किंवा पँटला काहीसा स्पर्श करीत यष्टीरक्षक डिविलियर्सच्या हातात गेला. खेळाडूंनी अपील केली असता मैदानातील पंच एस रवी यांनी त्याला नाबाद घोषित केले. वॉर्नरचा बळी महत्त्वाचा असल्याने बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने डीआरएस प्रणालीचा वापर केला.

वॉर्नरचा निर्णय देण्यासाठी तिसरे पंच वीरेंद्र शर्मा यांनी बराच वेळ घेतला. मात्र शेवटी वॉर्नरला त्यांनी बाद घोषित केले. बाद घोषित झाल्या नंतर वॉर्नर मात्र पुरता नाराज झाला होता. चेंडू नेमका कोणत्या भागाला घासुन गेलाय हे अस्पष्ट असतानाही हा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे क्रिकेटतज्ञ म्हणत आहेत. अशा परिस्थितीत मैदानावर दिलेल्या निर्णयाला अनुसरून ‘बेनेफिट ऑफ डाउट’ चा अवलंब करून नाबाद घोषित करणे अनेकांना अपेक्षित होते.

समालोचकांनी दाखवली तिसऱ्या पंचांवर नाराजी

न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरीश म्हणाला की, ‘तिसऱ्या पंचांनी घेतलेला निर्णय पुर्णतः चुकीचा आहे. वॉर्नरचे नाराज होणे साहजिकच आहे. वॉर्नर बादच झाला नव्हता. हा निर्णय बदलणे चुकीचे होते.’

समालोचक पॉमी मांग्वाच्या मते हा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता. ‘जर तुम्हाला ठोसपणे माहीत नाही चेंडू बॅटला लागला आहे की नाही तर तुम्ही मैदानावरील पंचांच्या निर्णयाचे समर्थन करायला हवे होते.’ असे मांग्वा म्हणाले.

मांग्वा सोबत समालोचन करणाऱ्या सुनील गावसकरने मात्र पंचांच्या निर्णयाचा आदर करायला हवा असे म्हणून चर्चेला पूर्णविराम दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

आनंदाची बातमी! ‘या’ छोट्या शहरात सुरु होतेय एमएस धोनीची क्रिकेट अकॅडेमी

नटराजनच्या यॉर्कर समोर ‘मिस्टर 360’ सुद्धा फेल; उडवला थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ

“थँक्यू विराट”, हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयामुळे विराटची ट्विटरवर उडतेय खिल्ली

ट्रेंडिंग लेख –

मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ

आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा

बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---