---Advertisement---

“कोणत्याही परिस्थितीत मी वर्ल्डकप खेळणारच”; सुंदरचे थेट जडेजाच्या जागेला आव्हान

On: शनिवार, डिसेंबर 10, 2022 1:39 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दौऱ्यावरील वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, या दोन सामन्यांमध्ये युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने ‌‌ चमकदार कामगिरी करून दाखवली. त्याचवेळी त्याने तिसऱ्या सामन्यापूर्वी बोलताना आपल्या भविष्यातील योजनेचा उलगडा केला.

सुंदर हा नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यावर शानदार कामगिरी करून आला होता. त्याने फलंदाजीत आक्रमक फटकेबाजी करताना एक अर्धशतक व एक 36 धावांची खेळी केलेली. तर, बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या सामन्यात त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलेले. तसेच त्याने गोलंदाजी सर्वोत्तम कामगिरी करताना दोन सामन्यात मिळून ‌5 ‌‌बळी देखील टिपले.

तिसऱ्या सामनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तो म्हणाला,

“मागच्या सामन्यात मला एक मोठी संधी मिळालेली. पुढील वर्षी विश्वचषक व्हायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत मला त्या विश्वचषकात जागा बनवायचीये. मला त्या संघातील असा खेळाडू बनायचे आहे जो कोणत्याही स्थितीत योगदान देऊ शकतो. संघ जे सामने जिंकेल त्यात मला महत्त्वाचा भाग व्हायचे आहे. सध्या मी आणखी आक्रमक फटके खेळण्याचा सराव करतोय. जेणेकरून त्याचा मला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फायदा होईल.”

रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यापासून सुंदर व अक्षर पटेल अष्टपैलूची भूमिका बजावत आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सुंदर ची कामगिरी सातत्याने चांगली होताना दिसतेय. जडेजा कधी पुनरागमन करणार याकडे बऱ्याच जणांचे लक्ष असेल. कारण तो संघाचा प्रमुख अष्टपैलू आहे. त्यामुळे सुंदर याला विश्वचषकात जागा पटकावण्यासाठी त्याच्याशी स्पर्धा करावी लागेल. जडेजा फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागात मोठे योगदान देत असतो. तसेच, तो संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू असल्याने त्याच्या अनुभवाचा देखील संघाला फायदा होतो.

(Washington Sundar Aiming 2023 World Cup Spot Challenge Jadeja)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला नडणाऱ्या पठ्ठ्याने सोडली इंग्लंडची साथ; ‘या’ देशासाठी खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट
BANvIND: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय; भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---