आयपीएल २०२१ चे उर्वरीत सामने १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत. हे सामने यूएईत आयोजित केले गेले आहेत. मात्र त्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. त्यांच्या संघातील अष्टपैलू खेळाडू वाॅशिंगटन सुंदर उर्वरित आयपीएल २०२१ सामन्यांना मुकणार आहे.
त्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याची संघातील जागा बंगालचा आकाश दीप घेणार आहे.
सुंदरला ही दुखापत भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर सराव सामन्यादरम्यान झाली आहे. त्यानंतर तो मायदेशात परतला होता. त्याला झालेली दुखापत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत नीट होईल असा अंदाज बांधला गेला होता. मात्र, तसे झाले नाही आणि त्याला या स्पर्धेतूनही माघार घ्यावी लागली आहे. स्पर्धेत त्याच्या अनुपस्थितीमुळे राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोठे नुकसान होऊ शकते.
वाॅशिंगटन सुंदरने स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती राॅयल चॅलेंजर बॅगलोरने संघने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. संघाने याव्यतिरिक्त अशीही माहिती दिली की, सुंदरच्या जागी बंगालचा गोलंदाज आकाश दिपला निवडले गेले आहे. आकाश दीप याआधी संघासोबत नेट गोलंदाजाची भूमिका पार पाडत होता.
आयपीयलच्या चालू हंगामात सुंदरला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जास्त संधी मिळाल्या नाहीत. फलंदाजी करताना त्याच्या क्रमात सतत बदल केला गेला तसेच गोलंदाजीतही करतानाही कर्णधार विराटने त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला नाही. या करणांमुळे तो त्याच्या प्रतिभेप्रमाणे प्रदर्शन करू शकला नव्हता.
या हंगामातील आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी सुंदर ६ सामन्यांमध्ये सहभागी झाला होता, यात त्याने फलंदाजीमध्ये ३१ धावा केल्या असून गोलंदाजीत ७.३७ च्या इकाॅनमीसह ३ विकेट्स घेतल्या आहेत. सुंदर जर लवकर दुखापतीतून सावरला नाही, तर त्याची टी २० विश्वचषकालाही मुकण्याची आशंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे आयोजन भारतात केले गेले होते. मात्र देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि आयपीएलमधील काही खेळाडूंना झालेला कोरोनाची लागण यामुळे हा हंगाम स्थगित केला गेला होता. त्यानंतर हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईत खेळवले जाणार आहेत. यूएईतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तसेच राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पहिला सामना २० सप्टेंबरला कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सुमीत अंटीलची सुवर्णमय कामगिरी! विश्वविक्रमासह भारताला मिळवून दिले दुसरे ‘सुवर्णपदक’
‘तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये जाताना रडलो होतो’, श्रेयस अय्यरने सांगितली वेदनादायी आठवण
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठे बदल, आता सर्व सामने होणार क्वीन्सलँडमध्ये; पाहा संपूर्ण वेळापत्रक