शुक्रवारी (दि. 15 सप्टेंबर) आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीचा अंतिम सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. या सामन्यात भारताला 6 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर भारतीय संघ रविवारी (दि. 17 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच भारतीय संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. संघाचा भाग बनण्यासाठी एक खेळाडू कोलंबोसाठी रवाना झाला आहे.
आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. अखेरच्या क्षणी संघात वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याची एन्ट्री झाली आहे. क्रिकबझ या आघाडीच्या क्रिकेट वेबसाईटच्या वृत्तानुसार, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर संघासोबत जोडण्यासाठी कोलंबोला रवाना झाला आहे. सुंदरला अक्षर पटेल याच्या जागी ताफ्यात सामील होण्यासाठी बोलावले आहे. खरं तर, अक्षर पटेल बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता.
Washington Sundar has replaced Axar Patel in India's Asia Cup Final squad. pic.twitter.com/yUuy7SwZib
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 16, 2023
बांगलादेशविरुद्ध अक्षर पटेलची कामगिरी
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेल याने 34 चेंडूत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. त्याने यादरम्यान 2 षटकार आणि 3 चौकारही मारले होते. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नव्हता.
दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदर अलीकडेच आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग होता. त्याने आयर्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2 सामने खेळले होते. मात्र, दोन सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. सुंदर आयपीएल 2023 स्पर्धेत दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो दीर्घ काळ क्रिकेटपासून दूर होता. (Washington Sundar has replaced Axar Patel in India’s Asia Cup Final squad against sri lanka)
भारताने गमावला सामना
भारतीय संघाने या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 265 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 49.5 षटकात सर्वबाद होऊन फक्त 259 धावाच करू शकला. त्यामुळे भारताला हा सामना 6 धावांनी गमवावा लागला.
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! श्रीलंकेला मोठा धक्का, स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त; भारताविरुद्ध खेळणार नाही Final
दक्षिण आफ्रिकेचा कहर! ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवला World Record, वनडेतील अखेरच्या 10 षटकात चोपल्या ‘एवढ्या’ धावा