भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा हा मागील काही काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. आशिया चषकावेळी झालेल्या दुखापतीनंतर तो अद्याप संघात पुनरागमन करू शकला नाही. जडेजा सध्या भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू आहे. मात्र, तो आणखी तीन-चार वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. त्यानंतर त्याची जागा कोण घेणार याबाबत आता भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी पर्याय सुचविला आहे.
रवींद्र जडेजा याला आशिया चषकाच्या साखळी फेरी वेळी दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला टी20 विश्वचषकात सहभागी होता आले नाही. बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची संघात निवड झाली होती. मात्र, तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसलेला नाही. त्याच्या याच दुखापतीमुळे त्याचा पर्याय कोण असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याबाबत बोलताना शिवरामकृष्णन म्हणाले,
“तुम्ही हार्दिकला या संघाचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणत असाल तर, वॉशिंग्टन सुंदर फिरकी गोलंदाजी अष्टपैलू होऊ शकतो. त्याच्यामध्ये जडेजाची जागा घेण्याची नक्कीच क्षमता आहे. तो एक असा किमती दगड आहे ज्याला पैलू पाडण्याची आवश्यकता आहे. तो भारताच्या दोन्ही संघात योग्यरीत्या बसतो. कारण तो फलंदाजी व गोलंदाजीत तितकेच योगदान देतो.”
सुंदर हा नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यावर शानदार कामगिरी करून आला होता. त्याने फलंदाजीत आक्रमक फटकेबाजी करताना एक अर्धशतक व एक 36 धावांची खेळी केलेली. या आधी देखील त्याने भारताने जिंकलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ब्रिस्बेन कसोटी जिंकण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. मात्र, सुंदर देखील दुखापतीमुळे आपली कारकीर्द फारशी मोठी करू शकला नाही.
(Washington Sundar Is Perfect Replacement Of Ravindra Jadeja Laxman Shivramkrishnan Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबी आशिया चषकातून माघार घेतानाही मागे पुढे पाहणार नाही! रमीझ राजांचे मोठे विधान
पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत 10 संघांचा समावेश