---Advertisement---

आईच्या हातचा घास, बहिणीची प्रेमळ मिठी अन् बाबांची शिकवण; कुटुंबीयांच्या आठवणीत सुंदर झाला भावुक

On: रविवार, एप्रिल 25, 2021 3:47 PM
---Advertisement---

आयपीएल 2021 च्या मोसमात रॉयल चेंलेंजर्स बेंगळुरू संघाची सुरूवातीची कामगिरी खूपच चांगली राहिली आहे. या संघाने यंदाच्या मोसमात चारपैकी चार सामने जिंकले आहेत. त्यामुळे संघातील खेळाडू आणि चाहते आनंदी दिसत आहेत. परंतु या संघातील 21 वर्षीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला त्याच्या कुटुबीयांची आठवण सतावत आहे.

सुदंरने इंस्टाग्रामवर आपल्या जुन्या फोटोंची एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे, ज्याखाली त्याने ‘माझ्या घरात माझी क्रेझी लोक राहत असून मला त्यांची आठवण येत आहे.’ असे लिहले आहे. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वॉशिंग्टन सुंदर जवळ जवळ आठ महिने झाले घरापासून दूर असल्याने त्याने ही पोस्ट केली आहे. कारण कोरोनामुळे तो अगोदर आयपीएल 2020 मध्ये बायो बबलमध्ये होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तो भारतीय संघात सामील झाला होता. त्यानंतर आता तो आयपीएल 2021 खेळण्यात व्यस्त आहे. त्यामुळे त्याला घराची आठवण येत असल्याने त्याने ही पोस्ट केली आहे.

https://www.instagram.com/p/COCcBsABSwC/

वॉशिंग्टन सुंदरचा जन्म 5 ऑक्टोंबर रोजी चेन्नईमधील डिंडीगुल गावात झाला असून त्याचे वडील मणि सुंदर हे रणजी क्रिकेटमधील तमिळनाडू संघाचे माजी खेळाडू आहेत. त्यांच्याकडूनच वॉशिंग्टन सुंदरला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. त्याच्या कुटुंबात आई वडीलांसोबत त्याची शैलजा नावाची एक बहीण असून तीदेखील क्रिकेट खेळते.

तसेच सुंदरने एका मुलाखतीमध्ये त्याला एकाच कानाने ऐकू येत नसल्याचे सांगितले होते. त्याला या गोष्टीची माहीती बालपणी झाली होती त्याचा आईने यावरती उपचारही केले असल्याचे त्याने सांगितले. तो आपल्या खेळासोबत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून आपले फोटो शेअर करत असतो. मागे एकदा त्याने आपल्या कुत्र्यासोबतचा फोटो शेअर करत त्याने पदार्पण केलेल्या गाबा या ठिकाणाचे नाव त्या कुत्र्याला दिले असल्याचे त्याने सांगितले होते.

सुंदरने यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून भारतीय संघात पदार्पण केले असून त्यामध्ये त्याने 4 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 265 धावा करून 6 बळी घेतले होते. तर आयपीएलमध्ये त्याने 40 सामने खेळले असून त्यामध्ये 24 डावांत 204 धावा केल्या आहेत. तर 27 बळी घेतले आहेत. सध्या तो आयपीएलमध्ये आरसीबी संघात असून आरसीबीचा सामना रविवारी (25 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सीएसके विरुद्ध आरसीबी ‘महामुकाबला’ पाहण्यासाठी चाहते आतुर, सोशल मीडियावर धोनी-कोहलीच्या फोटोंचा धुमाकूळ

एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे! ‘माही’ने स्टाफ मेंबरला केला सलाम, फोटो तूफान व्हायरल

जेव्हा कोहली धोनीचे ग्लोव्हज घालून करतो त्याचीच नक्कल, Video पाहून जुन्या आठवणी होतील ताज्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---