भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध 302 धावांनी मोठा विजय मिळवला होता. फलंदाजांनी 357 धावा उभारल्यानंतर गोलंदाजांनी केवळ 55 धावांवर श्रीलंकेचा खुर्दा उडवलेला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त स्विंग गोलंदाजीचे प्रदर्शन करत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू हसन रझा यांनी याबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावर आता पाकिस्तानचेच माजी कर्णधार व दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
संपूर्ण विश्वचषकात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना विरोधी संघांवर दबाव ठेवला आहे. मागील दोन सामन्यात मोहम्मद शमी, सिराज व बुमराह यांनी विरोधी संघांना अक्षरशः जखडून ठेवून आपला दबदबा निर्माण केला. त्यानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू हसन रझा म्हणाले,
“मला असे वाटत आहे की, आयसीसी आणि बीसीसीआय भारतीय गोलंदाजांना वेगळ्या पद्धतीचा चेंडू देत आहेत. हा चेंडू अधिक स्विंग होतोय. याची चौकशी व्हायला हवी.”
त्यावर प्रतिक्रिया देताना अक्रम म्हणाले,
“या गोष्टी फक्त हास्यास्पद आहेत. तुम्ही असे बोलून स्वतःची तर स्वतःची आमची देखील लाज काढत आहात. चेंडू देण्यावेळी तेथे मॅच रेफ्री, चार पंच आणि इतरही लोक असतात. हे केवळ भारतीय गोलंदाजांचे कौशल्य आहे. ते जगात सर्वोत्तम आहेत.”
भारतीय संघासाठी वेगवान तिकडीने प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करताना विरोधी फलंदाजांना जेरीस आणले आहे. भारतासाठी तिघांनी देखील दहापेक्षा जास्त बळी मिळवले आहेत.
(Wasim Akram Epic Reply To Hasan Raza On His Statement)
महत्वाच्या बातम्या –
भारत-श्रीलंका सामन्यात फिक्सिंग? बोर्डाने उचलले गंभीर पाऊल, वाचा सविस्तर
BIG BREAKING: टीम इंडियाचा हुकमी एक्का वर्ल्डकपमधून बाहेर, ‘या’ खेळाडूची संघात एंट्री