---Advertisement---

क्वारंटाईनमध्ये राहून वसीम अकरमची पडली टक्कल; बघून तोंडून निघेल, ‘ये क्या हुआ? कैसे हुआ?’

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 9:22 PM
---Advertisement---

एकेकाळचा पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अकरम, ज्याच्या वेगवान गोलंदाजीने समोरच्या फलंदाजाला घाम फुटत असे. तो आजकाल सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. तो सध्या विलगीकरणात आहे. मात्र विलगीकरणात राहून त्याची अशी अवस्था झाली आहे की, त्याचे चाहते त्याला पाहून गोंधळून गेले. अनेकांना तर त्याला ओळखणेही कठीण गेले.

तो यावेळी ऑस्ट्रेलियाच्या एका हाॅटेलमध्ये विलगीकरणात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी विलगीकरणाचे नियम खूप कडक केले गेले आहेत. त्याचा या हाॅटेलमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने स्वत: त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा फोटो शेअर केला आहे.

माजी वेगवान गोलंदाज या हाॅटेलमध्ये मागच्या १२ दिवसांपासून राहत आहे. दरम्यान त्याच्या डोक्यावरचे केस पूर्ण गळाले आहेत. त्यामुळे त्याचे चाहते त्याला पाहून हैराण झाले आहेत. अकरमने विलगीकरणाच्या १२ व्या दिवशी हा फोटो शेअर केला आहे. फोटोत त्याच्या डोक्यावरचे केस गळालेले दिसत आहेत. त्याच्या डोक्यावर केवळ दोन्ही बाजूंना केस आहेत. मात्र मध्यबागीचे केस गायब झाले आहेत.

त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “विलगीकरणात १२ दिवस राहिल्यानंतर, शेवटी मला माझे रेझर मिळाला. आता आनंदी आहात? #क्वारंटीन लाइफ.”

https://twitter.com/wasimakramlive/status/1432843500446388224?s=20

असे असले तरी फोटोत दिसत आहे की, हे त्याचे खरे केस नसून त्याने विग घातले आहे. त्याचे हे रूप त्याच्या चाहत्यांमध्ये खूप व्हायरल होत आहे. चाहते सोशल मीडियावर त्याच्या पोस्टवर मजेदार कमेंट्स करत आहेत.

अकरमने पाकिस्तान संघासाठी १०४ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये ४१४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ३५६ एकदिवसीय सामन्यात ५०२ विकेट्स मिळवल्या आहेत. त्याने नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो व्यायाम करताना दिसत होता. त्याने व्हिडिओत सांगितले होते की, त्याने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी एक सायकल घेतली आहे आणि तो दररोज ४५ मिनिटे ती सायकल चालवतो. अकरमला हे सांगायचे होते की, विलगीकरणातील जीवन खूप कठीण असते.

नुकतीच माजी क्रिकेटपटू रमीज राजाची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अशीही चर्चा होती की अकरम सुद्धा या पदासाठी इच्छुक होता, पण त्याने नंतर या चर्चा चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---