पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार आणि महान गोलंदाज वसीम अक्रम यांनी बुधवारी (२० जुलै) एक मोठे वक्तव्य केले. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एकदिवसीय प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि चाहत्यांच्या या प्रकाराकडचा ओढाही दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एकदिवसीय प्रकार आता बंद केला गेला पाहिजे. जाफर यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.
एका वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टवर वसीम अक्रम (Wasim Akram) बोलत होते. या कार्यक्रमात बोलत असतानाच त्यांनी एकदिवसीय क्रिकेटविषयी (ODI Cricket) हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, “क्रिकेट प्रशासनाने आता ५० षटकांचा प्रकार बंद केला पाहिजे. एका समालोचकाच्या रूपात मला एकदिवसीय क्रिकेट खूप लांब वाटते.”
“मला असेही वाटते की, इंग्लंडमध्ये स्टेडियम पूर्ण भरलेले असते. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका याठिकाणी एकदिवसीय सामन्यादरम्यान तुम्ही स्टेडियम पूर्ण भरवू शकत नाहीत,” असे अक्रम पुढे बोलताना म्हणाले.
वसीम अक्रमच्या मते एकदिवसीय क्रिकेटमध्ये चाहत्यांची रूची राहिलेली नाहीये आणि तरीही हा प्रकार खेळवला जात आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “ते हा प्रकार फक्त खेळवायचा म्हणून खेळवत आहेत. फक्त एक धाव घ्या, एक चौकार मारा, चार क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या आतमध्ये, तुम्ही ४० षटकांमध्ये २००, २२० धावा करा आणि शेवटच्या १० षटकांमध्ये १०० धावा अजून करा. बास, एवढेच सुरू असते.”
इंग्लंडला २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेल्या बेन स्टोक्सने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बेन स्टोक्सने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वजण हैराण आहेत आणि अक्रमही याविषयी व्यक्त झाले. ते म्हणाले की, “टी-२० एकप्रकारे सोपा खेळ आहे, जो चार तासात संपतो. एकदिवसीय क्रिकेट मात्र समाप्त होत चालले आहे.”
दरम्यान, वसीम अक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. एकदिवसीय क्रिकेटविषयी अशा प्रकारची प्रतिक्रिया देणाऱ्या अक्रमने त्यांच्या कारकिर्दीत एकूण ३५६ सामने खेळले आणि यामध्ये ५०२ विकेट्स घेतल्या. कसोटी कारकिर्दीचा विचार केला तर, त्यांनी १०४ सामन्यांमध्ये ४१४ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘…तर मी भारताविरुद्ध खेळलायला घाबरलो असतो’, विराट कोहलीविषयी रिकी पाँटींगचे मोठे विधान
‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यामागे आयसीसीची मोठी रणनिती
अखेर ठरलंय! श्रीलंकेतील आर्थिक संकट लक्षात घेता ‘या’ देशात होणार आशिया चषकाचे आयोजन