गेल्या दीडवर्षापासून जगातील जवळपास सर्व देश कोरोना व्हायरसच्या महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या या विळख्यात अनेक क्रिकेटपटूही अडकले आहेत. काहीदिवसांपूर्वीच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तो घरी एकांतवासात होता. पण त्यानंतर सचिनने शुक्रवारी (२ एप्रिल) माहिती दिली की तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे.
सचिनचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच केवळ भारत देशातूनच नाही तर जगभरातून त्याला ‘लवकर बरा हो’, असे संदेश येत आहेत. नुकतेच तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे कळताच पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू वसीम अक्रमने त्याच्यासाठी खास संदेश लिहिला आहे.
अक्रमने सचिन लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करताना सचिनने वयाच्या १६ व्या वर्षी खेळलेल्या सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांची आठवण करुन दिली आहे. अक्रमने ट्विट केले आहे की ‘जेव्हा तू १६ वर्षांचा होता, तेव्हा तू जिद्दीने आणि आत्मविश्वासाने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना केला होतास. त्यामुळे मला खात्री आहे तू कोविड-१९ विरुद्धही षटकार ठोकशील. लवकर बरा हो मास्टर. डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या कर्मचार्यांसह भारताच्या २०११ विश्वचषक विजेतेपदाचा वर्धापन दिन साजरा केला तर छान होईल. मला फोटो पाठव.’
Even when you were 16, you battled world’s best bowlers with guts and aplomb… so I am sure you will hit Covid-19 for a SIX! Recover soon master! Would be great if you celebrate India’s World Cup 2011 anniversary with doctors and hospital staff… do send me a pic! https://t.co/ICO3vto9Pb
— Wasim Akram (@wasimakramlive) April 2, 2021
भारताने १० वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ रोजी २०११ विश्वचषकाचे विजेतेपद अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करुन जिंकले होते. या विजेतेपदाला शुक्रवारी १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
सचिनची ९० च्या दशकात खेळलेल्या अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी चांगली मैत्री आहे. अक्रमच्या या ट्विटवरुनही त्यांच्या मैत्रीची कल्पना येऊ शकते.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही ट्विट करत सचिन लवकर बरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Wishing you a speedy recovery Legend . No doubt that you will make a strong recovery.
May your hospital stay be short and your recovery even shorter! https://t.co/JfYhJeBTre— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 2, 2021
सचिनने ट्विट करत दिली माहिती
सचिनने शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती ट्विट करत दिली होती. त्याने ट्विटमध्ये म्हटले की ‘मला शुभेच्छा देण्यासाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. माझ्या कुटुंबीयांना माझ्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मी वैद्यकिय सल्ल्यानुसार जवळच्या रुग्णालयात क्वारंटाईन झालो आहे. लवकरच मी घरी परतण्याची आशा करतो. सर्व भारतवासींना आणि माझ्या संघ सहकाऱ्यांना विश्वचषक विजयाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा.’
Thank you for your wishes and prayers. As a matter of abundant precaution under medical advice, I have been hospitalised. I hope to be back home in a few days. Take care and stay safe everyone.
Wishing all Indians & my teammates on the 10th anniversary of our World Cup 🇮🇳 win.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 2, 2021
यापूर्वी २७ मार्च रोजी सचिनने त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट करत सांगितले होते. त्याने ट्विटमध्ये म्हटले होते, ‘माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी मागील काही काळापासून सतत चाचण्या करत होतो. काही सौम्य लक्षणे आढळल्याने मी स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे. माझ्या कुटुंबातील इतर कोणालाही या आजाराची लागण झाली नाही.’
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळलेल्या ४ भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण
खरंतर छत्तीसगढमधील रायपूर येथे ५ ते २१ मार्च दरम्यान रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक माजी दिग्गज खेळाडू एकत्र खेळताना दिसले होते. यात सचिनसह अनेक भारतीय क्रिकेटपटूही इंडिया लिजेंड्सकडून खेळले होते. या स्पर्धेनंतर सचिनसह युसूफ पठाण, इरफान पठाण आणि एस बद्रिनाथ या क्रिकेटपटूंचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा वादात सापडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅनचा कारनामा! आयपीएलमधील ‘हे’ दोन भन्नाट विक्रम करणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू