---Advertisement---

‘ज्याप्रकारे पूर्ण देश हसन अलीच्या मागे लागला आहे, ते आपल्याला नको’, माजी क्रिकेटरने टीकाकारांना सुनावले

On: शनिवार, नोव्हेंबर 13, 2021 12:43 AM
---Advertisement---

गुरुवारी(११ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पाच विकेट्स राखून पराभव केला. पराभवानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर गेला आहे आणि चाहते यासाठी संघातील एकाच खेळाडूला लक्ष्य करत आहेत. सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या हसन अलीने एक महत्वाचा झेल सोडला, जो पाकिस्तानला चांगलाच महागात पडला. आता पराभवानंतर सोशल मीडियावर हसन अलीला ट्रोल केले जात आहे. अशात पाकिस्तान संघाचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम अलीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांनी अलीवर टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.

हसन अलीने गोलंदाजी करताता चार षटकात ४४ धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याने शाहीन अफ्रिदीच्या १९ व्या षटकातील गोलंदाजीवेळी मॅथ्यू वेडचा महत्वाचा झेल सोडला आणि त्यानंतर वेडने सलग तीन षटकार मारून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. वेडने या सामन्यात १७ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या. यानंतर हसन अली चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

अक्रम ए स्पोर्ट्सवर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ज्याप्रकारे पूर्ण देश हसन अलीच्या मागे लागला आहे, ते आपल्याला नको आहे. मी आणि वकार युनूसही अशा परिस्थितीतून गेलो आहोत. बाकी देशांसाठी हा केवळ खेळ एक आहे. पुढच्या दिवशी तुम्ही खेळाडूला थोडा दिलासा द्या, हा एक खराब दिवस आहे, पुढच्या वेळी अधिक चांगले असेल, आता पुढे गेले पाहिजे.

खेळाडू आणि चाहत्यांसाठी कठीण काळ आहे. खेळाडू त्यांच्या खोलीत जातील, ते शांत राहतील, ते त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा करणार नाहीत आणि हा पराभव त्यांना त्रास देईल. अशात एका देशाच्या रूपात आपण आगीत तुप ओतण्याचे कामे करू इच्छित नाही, असेही अक्रम पुढे बोलताना म्हणाले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानने २० षटकांमध्ये चार विकेट्सच्या नुकसानावर १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १९ व्या षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर १७७ धावांचे लक्ष्य गाठले. आता रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनमध्ये पाकिस्तानला भोवल्या ‘या’ ५ चूका, ज्यामुळे व्हावे लागले टी२० विश्वचषकातून बाहेर

‘कोणीही एकमेकांना दोष देणार नाही’, सेमीफायनल हरल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये बाबर आझमच्या सहकाऱ्यांना सुचना

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पोहचला जयपूरमध्ये, टीम इंडियाचे ‘हे’ खेळाडूही ‘पिंकसिटी’मध्ये दाखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---