पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम यांना जावेद मियांदाद यांच्यामुळे पाकिस्तानसाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. वसीम आक्रमने स्वतः त्यांच्या पदार्पणाचा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे जावेद मियांदाद यांनी निवडकर्त्यांसमोर त्यांच्या गोलंदाजीचे कौतुक केल्यामुळे त्यांना पदार्पणाची संधी मिळाली होती.
वसीम अक्रम (Wasim Akram) वयाच्या 18 व्या वर्षी एका क्लबसाठी क्रिकेट खेळत होता. यादरम्यानच्या काळात त्याने पहिल्यांदा राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी ट्रायल दिली. 60 इतर स्थानिक गोलंदाज असताना अक्रमला पाकिस्तानचा तेव्हाचा कर्णधार जावेद मियांदाद (Javed Miandad) यांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. जावेद मियांदाद त्यावेळी दुखापतीतून सावरल्यानंतर गद्दाफी स्टेडियममध्ये होते. अशात अक्रमने त्यांना चांगली गोलंदाजी केली स्वतःचा प्रभाव देखील पाडला होता. मियांदात अक्रमच्या गोलंदाजीतील स्विंग पाहून चांगलाचे प्रभावित झाले होते आणि त्यांना निवडकर्त्यांच्या समोर त्यांचे कौतुक देखील केले होते.
ही ट्रायल दिल्याच्या नंतर काही आठवड्यांना, 1985 मध्ये पाकिस्तान संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी अक्रमला राष्ट्रीय संघात निवड झाल्याचे समजले आणि त्याने या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण (कसोटी) देखील केले. या दौऱ्यानंतर पाकिस्तानला एक महान वेगवान गोलंदाज मिळाला. अक्रमने दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता. तो म्हणाला की, “मला जाणवले होते की, जेव्हा लाहोरमध्ये जावेदने मला पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हाच ओळखले होते. त्यांनी प्रमुख निवडकर्त्यांपैकी एकासमोर माझे कौतुक केले. त्यानंतर मी विचार केला आपले काहीतरी होऊ शकते आणि खेळावर लक्ष केंद्रित करू लागलो.”
अक्रमच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील विचार केला, तर त्याने 356 एकदिवसीय सामन्यांमध्ये 23.52 च्या सरासरीने 502 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 104 सामन्यांमध्ये 23.62 च्या सरासरीने 414 विकेट्स घेतल्या आहेत आणि मोठ्या काळापर्यंत पाकिस्तान संघाचे नेतृत्व देखील केले. 1992 साली खेळल्या गेलेल्या विश्वचषकातच्या अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी अक्रमची भूमिका महत्वाची राहिली होती. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला मात दिली होती. (Wasim Akram’s disclosure! Because of ‘this’ player, he got an opportunity to play for Pakistan at a young age)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुण्याची देविका घोरपडे स्पेनमध्ये चमकली! युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकले गोल्ड
पाणी काढण्यासाठी सूर्या स्वतः उतरला मैदानात, व्हिडिओ होतोय व्हायरल