मुंबई क्रिकेट संघ सध्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. यासाठी त्यांनी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे काही दिग्गज खेळाडूंनी प्रशिक्षकपदासाठी अर्द दाखल केले आहेत. यामध्ये मुंबईचा माजी दिग्गज फलंदाज वासीम जाफरचा देखील समावेश आहे.
वसीम जाफरला मुंबई संघाकडून खेळण्याचा मोठा अनुभव आहे. तसेय यापूर्वी त्याने उत्तराखंडच्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे. परंतु, त्याच्या कार्यकाळादरम्यान वाद झाल्याने त्याने उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. सध्या तो आयपीएलमधील पंजाब किंग्स संघाच्या प्रशिक्षकांच्या टीमचा भाग आहे.
जाफरशिवाय साईराज बहुतुले आणि प्रथम श्रेणीचे माजी क्रिकेटपटू अमोल मजुमदार आणि भारताच्या 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे माजी वेगवान गोलंदाज बलविंदरसिंग संधू यांनी देखील मुंबईचे प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज दिला आहे.
जाफरने भारताकडूनही २००० ते २००८च्या दरम्यान ३१ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. यावेळी त्याने ५ शतके आणि ११ अर्धशतके ठोकत १९४४ धावा केल्या. तसेच त्याने रणजी ट्रॉफी या मानाच्या स्पर्धेतही १२ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
एमसीएने दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की ९ उमेदवारांनी मुंबईच्या वरिष्ठ संघासाठी मुख्य प्रशिक्षकाच्या पदासाठी अर्ज दिले आहेत. यामध्ये बलविंदरसिंग संधू, वसीम जाफर, साईराज बहुतुले, अमोल मजुमदार, सुलक्षण कुलकर्णी, प्रमोद सुंदरराम, नंदन फडणीस, उमेश पटवाल आणि विनोद राघवन यांचा समावेश आहे.
तसेच असेही समजत आहे की उमेदवारांच्या मुलाखतीनंतर मुंबई संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अंतिम निवड केली जाईल. ही मुलाखतीची प्रक्रिया येत्या मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरु होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ गोष्टीमुळे जसप्रीत बुमराहची कारकीर्द आहे धोक्यात, रिचर्ड हॅडली यांचा इशारा
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाने सुरू केली ‘ही’ प्रक्रिया; आजपासून झाली सुरुवात
हे भारी आहे! ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये आता सचिन, विराटच्या नावाने असणार घराचा पत्ता