---Advertisement---

इंग्लंडमध्ये भारतीय संघाला भोवते सलामीवीरांचे अपयश, ‘ही’ आहे २० वर्षातील सर्वात यशस्वी जोडी

On: गुरूवार, जुलै 8, 2021 5:26 PM
Dinesh Karthik and Wasim Jaffer
---Advertisement---

न्यूझीलंडकडून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर आता भारतीय संघ पुढील कसोटी मालिका इंग्लंडविरुद्ध होणार आहे. ही मालिका ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथे सुरू होईल. घरच्या मैदानावर इंग्लंडला पराभूत करणे भारताला कधीच सोपे राहिलेले नाही. इंग्लंडमध्ये गेल्या वीस वर्षांत भारताने २१ कसोटी सामने खेळले आहेत. परंतु यापैकी केवळ ४ कसोटी सामने जिंकण्याचा त्यांना यश आले.

इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या अखेरच्या दहा कसोटी सामन्यांत भारताने केवळ दोन विजय मिळवले आहेत, तर ७ पराभव स्वीकारले आहेत. भारतीय संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे सलामीची जोडी राहिली आहे. इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थितीत भारतीय सलामीवीर नेहमीच संघर्ष करत असतात. मागील २० वर्षांचा विचार केल्यास ही गोष्ट खरी असल्याचे समोर येते.

भारताने आजमावले इतके सलामीवीर
या २० वर्षाचा विचार केल्यास भारतीय संघाने सलामीवीर म्हणून १० फलंदाजांना आजमावून पाहिले. यात राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, शिखर धवन, दिनेश कार्तिक, संजय बांगर, वसीम जाफर, अभिनव मुकुंद, मुरली विजय आणि केएल राहुल यांचा समावेश आहे. द्रविड, सेहवाग आणि गंभीर सारखे दिग्गज फलंदाजही या भूमिकेला नाही देऊ शकले नाहीत.

न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात सलामीच्या जोडीचे महत्त्व कळून आले. या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये रोहित आणि शुबमन गिलची जोडी मोठी भागीदारी करू शकली नाही. याचा परिणाम सामन्याच्या निकालावर झाला आणि भारताने सामना आणि कसोटी चॅम्पियनशिपचा मुकुट ८ गडी राखून गमावला.

ही जोडी ठरली सर्वांत यशस्वी
भारतीय संघाने इंग्लंडमध्ये आपला अखेरचा कसोटी मालिका विजय राहुल द्रविडच्या नेतृत्वात २००७ मध्ये मिळवला होता. संघ व्यवस्थापनाने या तीन सामन्यांच्या मालिकेत सलामी जोडीमध्ये अजिबात बदल केला नाही. वसीम जाफर व दिनेश कार्तिक यांनी या तिन्ही सामन्यांत ६ डावांमध्ये ५३ च्या सरासरीने ३२२ धावा बनविल्या.

नॉटिंघम येथे झालेल्या मालिकेच्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात कार्तिक आणि जाफरने १४७ धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये कार्तिकने ७७ आणि जाफरने ६२ धावा केल्या आणि भारताने ही कसोटी ७ गडी राखून जिंकली. १९८६ नंतर भारताला प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश आले होते.

भारताकडे आहेत हे पर्याय
आगामी मालिकेसाठी भारतीय संघात सलामीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शुबमन गिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. तरीही, संघाकडे रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अगरवाल हे पर्याय उपलब्ध आहेत. अभिमन्यू ईस्वरन हा देखील संघासह इंग्लंडमध्येच आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सारा तेंडुलकरने ‘ती’ पोस्ट शेअर करताच, चाहत्यांना पुन्हा आठवला शुबमन गिल

भारतासोबत खेळून मालमाल होणार श्रीलंका क्रिकेट, ६ सामन्यांचे मिळणार चक्क ‘इतके’ कोटी

सध्याच्या भारतीय संघातील केवळ ‘हे’ ६ खेळाडू खेळलेत श्रीलंकेविरुद्ध वनडे; एकट्या द्रविडच्या धावा आहेत त्यांच्यापेक्षा अधिक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---