---Advertisement---

भारतीय संघावर टीका करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मंत्र्याला वसीम जाफर यांचे सडेतोड उत्तर, केले ‘असे’ ट्विट

On: सोमवार, जानेवारी 4, 2021 8:45 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया सांघारम्यान 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे .या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यानंतर दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी येथे , तर चौथा सामना 15 जानेवारीपासून ब्रिसबन येथे खेळला जाणार आहे.

मात्र याच दरम्यान चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघ ब्रिसबनला जाण्यास तयार नसल्याचे वृत्त समोर येत होते. यावर क्वींसलॅंडच्या मंत्री रोस बेट्स यांनी भारतीय संघावर निशाणा साधत वक्तव्य केले होते की, “भारतीय संघाला नियमांची अंमलबजावणी करायची नसेल, तर त्यांनी इकडे न आलेलेच बरे राहील.” बेट्स यांच्या या वक्तव्यावर भारताचे माजी खेळाडू वसीम जाफर यांनी विनोदी शैलीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वसीम जाफर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा फोटो शेअर करत ऑस्ट्रेलियन मंत्र्यांचे वक्तव्य लिहिले,” आमच्या नियमानुसार खेळा किंवा येथे येऊच नका.” यानंतर जाफर यांनी खाली लिहले, “भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सोबत.” जाफर यांनी शेअर केलेल्या आर्चरच्या फोटोत त्याने एक बॅग पाठीला अडकवली आहे. जाफर यांच्यामते भारतीय संघ ब्रिसबनला जाताना सिडनी येथील सामना जिंकून मानाची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्यासोबत घेऊन जाईल.

https://twitter.com/WasimJaffer14/status/1345617238439522310?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1345617238439522310%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-wasim-jaffer-comes-up-with-savage-reply-after-queensland-minister-tells-team-india-to-play-by-the-rule-3401732.html

दरम्यान हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, भारतीय संघातील एका सूत्राने माहिती दिली होती की, भारतीय संघ ब्रिसबन येथे पुन्हा लॉकडाऊन मध्ये जाण्यास तयार नाही. यावर ऑस्ट्रेलियन मिडिया मध्ये विविध पडसाद उमटत आहे. त्यामुळेच रोस बेट्स यांनी वरील वक्तव्य केले होते.बेट्स यांच्या टीकेवर अनेक भारतीय क्रिकेट रसिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यातच जाफर यांनी आपल्या विनोदी शैलीत प्रत्युत्तर दिले असल्याने त्यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

 मोठी बातमी- श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघातील ‘या’ खेळाडूचा रिपोर्ट आला कोरोना पाॅझिटिव्ह

आजच्याच दिवशी मुरलीधरनच्या फिरकीच्या तालावर नाचले होते झिम्बावेचे फलंदाज; थोडक्यात हुकला होता हा विक्रम

एका शब्दात रोहितची ओळख..? चाहत्याच्या प्रश्नावर पाकिस्तानी दिग्गजाने दिले मन जिंकणारे उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---