भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर याने आपल्या संघाच्या निवड प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली. जाफरच्या मते निवड समितीने ऐन उमेदीच्या काळात त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. याच कारणास्तव त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी जास्त सामने खेळता आले नाहीत.
वसीम जाफर (Wasim Jaffer) आपल्या वक्तव्यांसाठी आणि सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमीच चर्चेत असतो. भारतीय संघाचा हा माजी क्रिकेटपटू नेहमीच संघासाठी वरच्या फळीत खेळला. भारतासाठी (Team India) त्याने फेब्रुवारी 2000 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना एप्रिल 2008 मध्ये खेळला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत वसीम जाफर याने 31 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले. जाफर भारतीय संघाला लाफलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक राहिली आहे. मात्र, सलामीवीर फलंदाज या कारकिर्दीवर समाधानी दिसत नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त संधी मिलाल्या नाहीत, म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जाफर याबाबत बोलला.
वसीम जाफर म्हणाला की, “नक्कीच मी यामुळे निराश आहे की, मला 2008 नंतर संघात घेतले गेले नाही. मला लक्षात आहे की, मी काही निवडकर्त्यांशी यासंदर्भात चर्चा देखील केली होती. पण त्यांचे उत्तर आले की, संघ आता माझ्या नावावर विचार करत नाहीये. मी या निर्णयामुळे खूप हैराण होतो. कारण 30-31 व्या वर्षी एकादा फलंदाज परिपक्व होतो. हे जास्त आश्चर्यकारण होतो कारण, त्याच वर्षी मी मुंबई रणजी संघाचा कर्णधार बनलो आणि आम्ही विजेतेपद जिंकले. त्या रणजी ट्रॉफीसाठी मी 1260 धावा केल्या होत्या. संपूर्ण हंगामात मी 2000 पेक्षा अधिक धावा केल्या.”
वसीम जाफरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 1944 धावा आहेत, ज्या त्याने 34.10च्या सरासरीने केल्या आहेत. वनडे प्रकारात त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत(10). असे असले तरी, त्याची ओळख देशांतर्गत क्रिकेटच्या प्रदर्शनामुळे जगाला झाली. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 260 सामन्यात 19410 धावा केल्या आहेत. यात 314* धावांची सर्वोत्तम खेळीही आहे. लीस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 118 सामन्यांमध्ये 4849 धावा केल्या. तसेच देशांतर्गत टी-20 क्रिकेटमध्ये त्याला 23 सामन्यांमध्ये 616 धावा करता आल्या. (Wasim Jaffer expressed his displeasure over the lack of international cricket opportunities in his career)
महत्वाच्या बातम्या –
कॅलिसचा क्लास 47 व्या वर्षीही कायम! 22 चेंडूवर ठोकले वादळी अर्धशतक, पाहा व्हिडिओ
अहमदाबादमध्ये होणार वर्ल्डकपचा उद्घाटन सोहळा, जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी