---Advertisement---

धुआं-धुआं था वो समा… धुक्याने भरलेल्या कानपूर स्टेडियमला पाहून जाफरला सुचली मस्ती, शेअर केले मीम

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 10:30 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याला गुरुवारी (२५ नोव्हेंबर) सकाळीपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरुवात झाली. सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाज ज्यावेळी फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आले, तेव्हा मैदानात धुके आणि प्रदूषणामुळे धुर होता आणि चित्र स्पष्ट दिसत नव्हते. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने एक खास ट्वीट केले आहे.

माजी भारतीय सलामी फलंदाज वसीम नेहमीच सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट आणि मीम्स शेअर करत असतात. चाहतेही त्यांच्या मीम्सचे चाहते आहेत. जाफर त्यांच्या या मजेशीर मीम्समुळे नेहमीच चर्चेत देखील असतात. भारत न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी असेच एक मजेशीर मीम शेअर केले आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरून ही पोस्ट केली आहे.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी शशी कपूरचा जुना चित्रपट ‘आ गले लग जा’मधील एक सुप्रसिद्ध गाण्याचे बोल लिहिले आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “धुआं धुआँ था वो समा.” पोस्टमध्ये त्यांनी शेअर केलेले मिम ‘फॉग’च्या जाहीरातीलतमधील एका स्क्रीन शॉटच्या मदतीने बनवलेले आहे.

मिममध्ये दिसत आहे की, भारत आणि पाकिस्तान सीमेवरील जवान चर्चा करत आहेत. पाकिस्तानी हद्दीतील जवान म्हणतो की, ‘काय जनाब काय चालू आहे ?’ त्यावर भारताचा जवान म्हणतो की, ‘हिंदुस्तानात तर फॉग चालला आहे.’ जाफरने शेअर केलेले हे मीम चाहत्यांना खूपच आवडेले आहे आणि चाहते त्यावर व्यक्त होत आहेत.

दरम्यान, कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपेपर्यंत भारतीय संघाने ८४ षटकात चार विकेट्सच्या नुकसानावर २५८ धावा केल्या आहेत. यामध्ये भारतासाठी या सामन्यात पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७५ धावा केल्या आणि तो खेळपट्टीवर कायम आहे. तसेच सलामीवीर शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतक पूर्ण केले. जडेजा आणि अय्यरने शतकी भागिदारी केली असून दोघेही खेळपट्टीवर कायम आहेत. न्यूझीलंडच्या कायल जेमिन्सनने सर्वाधिक तीन विकेट्स गेतल्या. तसेच टिम साउदीने एक विकेट घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: अर्धशतकवीर शुभमन गिलची कमजोरी झाली जगजाहीर! सतत एकाच प्रकारे होतोय बाद

भारताला नडणाऱ्या किवी गोलंदाजाला शुभमनने ठोकला कडक षटकार, कपिल यांची करुन दिली आठवण

‘हे’ ५ क्रिकेटर ठरू शकतात चेतेश्वर पुजारासाठी धोक्याची घंटा, घेऊ शकतात कसोटी संघातील जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---