भारतीय संघाचा माजी कसोटी फलंदाज आणि देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू वसिम जाफर हा लवकरच नवीन भूमिकेत दिसून येणार आहे. आगामी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये तो ओडिसाच्या वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे. यासंदर्भातील घोषणा बुधवारी (१४ जुलै) करण्यात आली आहे. ओडिसा क्रिकेट संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूब्रत बहेडा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बहेडा म्हटले की, “ते (वसिम जाफर) संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. हा करार २ वर्षांकरिता असणार आहे.”
संघाच्या क्रिकेट सल्लागारांची बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. राज्याचे माजी कर्णधार रश्मी रंजन परिदा यांच्या जागी जाफरला संधी देण्यात आली आहे. रश्मी रंजन परिदा यांनी गेल्या २ हंगामात ओडिसा संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. बहेडा यांनी म्हटले की, “जाफर सर्व वयोगटातील क्रिकेटचा विकास करण्यासह राज्यातील प्रशिक्षकांच्या विकास कार्यक्रमांचा देखील एक भाग असणार आहेत. (Wasim jaffer named odisha cheif coach for upcoming season)
रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज वसीम जाफर दुसऱ्यांदा कुठल्या राज्याच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे. मार्च २०२० मध्ये निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याने उत्तराखंड संघाला प्रशिक्षण दिले होते. परंतु संघासोबत काहीतरी वाद झाला होता, ज्यामुळे त्याने राजीनामा दिला होता.
वसीम जाफरची कारकीर्द
वसीम जाफरने भारतीय संघासाठी एकूण ३१ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३४.१ च्या सरासरीने १९४४ धावा केल्या होत्या. यात ५ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्याला २ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली होती, ज्यामधे त्याला अवघ्या १० धावा करण्यात यश आले होते. तसेच त्याने २६० प्रथम श्रेणी सामन्यात ५०.६७ च्या सरासरीने १९४१० धावा केल्या आहेत. यामध्ये ९१ अर्धशतक आणि ५७ शतकांचा समावेश होता. तसेच ११८ लिस्ट ए सामन्यात त्याने ४४.०८ च्या सरासरीने ४८४९ धावा केल्या होत्या. यामध्ये ३३ अर्धशतक आणि १० शतक झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! इंग्लंड दौऱ्यातील कोरोना संक्रमित भारतीय खेळाडूचे नाव आले पुढे, पाहा कोण आहे तो?
रिषभची नेतृत्त्वपदावरुन सुट्टी! दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस उतरला मैदानात, सुरू केला सराव
इंग्लंड बी अलर्ट! पहिल्या डावात फ्लॉप ठरलेला अश्विन आला फॉर्मात, २७ धावांवर घेतल्या ६ विकेट्स