---Advertisement---

रिषभची नेतृत्त्वपदावरुन सुट्टी! दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस उतरला मैदानात, सुरू केला सराव

On: गुरूवार, जुलै 15, 2021 11:03 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. परंतु बीसीसीआयच्या अथक प्रयत्नांमुळे या स्पर्धेतील उर्वरित सामने येत्या १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर लवकरच पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज आणि आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे काही महिने क्रिकेटपासून दूर होता. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेदरम्यान त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मालिकेतून माघारी घ्यावी लागली होती. तसेच तो आयपीएल स्पर्धेत देखील सहभाग घेऊ शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली होती. (Good news for delhi capitals Shreyas iyer started batting practice ahead of ipl 2021 second phase)

परंतु आता आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यर फलंदाजीचा सराव करताना दिसून आला आहे. तब्बल तीन महिन्यानंतर त्याने सरावाला सुरुवात केली आहे. सराव करत असतानाचा व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. ही दिल्ली कॅपिटल्स संघाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच दुसऱ्या टप्प्यात जर श्रेयस अय्यरचे आगमन झाले तर दिल्ली कॅपिटल्स संघ आणखी मजबूत होईल यात काही शंका नाही.

https://twitter.com/Bewareofksgian/status/1415232877424353289?s=20

आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरित सामने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आधी खेळले जाणार आहेत. आयपीएल २०२१ स्पर्धेचे आणखी ३१ सामने शिल्लक आहेत. हे सामने खेळण्यासाठी बीसीसीआयला २१ दिवसांचा विंडो मिळाला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेत डबल हेडर सामने पाहायला मिळू शकतात. तसेच बीसीसीआयने उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक अजूनही जाहीर केले नाही. दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थानी आहे. स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने ८ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांना ६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा दरारा! चक्क पीपीई किट घालून खेळाडूंना ट्रेनिंग देतायत श्रीलंकेचे प्रशिक्षक, बघा व्हिडिओ

इंग्लंड बी अलर्ट! पहिल्या डावात फ्लॉप ठरलेला अश्विन आला फॉर्मात, २७ धावांवर घेतल्या ६ विकेट्स

श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक अडकले संकटात, ‘या’ प्रकरणी बोर्ड करणार चौकशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---