---Advertisement---

श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक अडकले संकटात, ‘या’ प्रकरणी बोर्ड करणार चौकशी

On: गुरूवार, जुलै 15, 2021 9:31 AM
---Advertisement---

येत्या काही दिवसात भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांचा थरार रंगणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना १८ जुलै रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेला १३ जुलैपासून प्रारंभ होणार होता. पण संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि डेटा विश्लेषक यांना कोरोनाची लागण झाली होती, ज्यामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु आता फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर यांच्या चिंतेत वाढ होताना दिसून येत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? चला जाणून घेऊया.

झिम्बाब्वेचे माजी खेळाडू आणि श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंका संघासोबत होते. श्रीलंका संघातील खेळाडूंना इंग्लंडहून मायदेशी परतल्यानंतर घरी जाण्याची अनुमती दिली गेली नाही. त्यांना हॉटेलमध्येच ठेवण्यात आले होते. इंग्लंडहून परतल्याच्या तीन दिवसांनंतर ग्रांट फ्लॉवर यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. परंतु त्यांच्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही खेळाडूला कोरोनाची लागण झाली नाही. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.  (Srilanka bating coach grant flower to face displinary probe by srilanka cricket)

श्रीलंका संघाच्या मेडिकल स्टाफमधील एका सदस्याने ईएसपीएन क्रीकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की, ग्रांट फ्लॉवर यांना कोरोनाची लागण कशी काय झाली?” फ्लॉवर सध्या विलगिरकरणात आहेत. हा कालावधी संपल्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे की, ते कोणाच्या संपर्कात आले होते का? तसेच त्यांनी कोविडच्या नियमांचे उल्लंघन केले आहे का? महत्वाची बाब म्हणजे इतर कुठल्याही खेळाडूला कोरोनाची लागण झाली नाही. तरी देखील इंग्लंडहून परतलेल्या खेळाडूंची आणखी एक आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे.

कोरोनाची भीती पाहता भारत विरुद्ध श्रीलंका वनडे आणि टी-२० मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. या मालिकेला येत्या १८ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

असे आहे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १८ जुलै
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाचा दरारा! चक्क पीपीई किट घालून खेळाडूंना ट्रेनिंग देतायत श्रीलंकेचे प्रशिक्षक, बघा व्हिडिओ

मोठी बातमी! इंग्लंडमधील २ भारतीय क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह, पाहा पहिली कसोटी खेळणार की नाही?

विघ्न संपेना! श्रीलंकेचा विस्फोटक फलंदाज जखमी, भारताविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---