---Advertisement---

वसीम जाफरने शेअर केले चक्क पाकिस्तानी पंतप्रधानांचे मिम, पाहा काय आहे प्रकरण

---Advertisement---

भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाचे फलंदाजी प्रशिक्षक असलेले वसीम जाफर हे सोशल मीडियावर आपल्या मजेशीर पोस्टसाठी खूप लोकप्रिय आहेत. नेटकऱ्यांना त्यांची ही शैली खूपच पसंत आहे. जाफर यांच्या मजेदार ट्वीटमुळे चाहते त्यांना ‘मीम किंग’ असेही म्हणतात. मागील काही दिवसांत ट्विटरवरील बंदी बाबत भारतात वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. ट्विटर बंदीवर पंजाब किंग्जने एक ट्विट केले असता,जाफर यांनी त्या ट्विटवर मजेशीर शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.

भारतात ट्विटर आणि फेसबुकवर बंदी घातली जाणार असल्याची बातमी मागे पसरली होती. याबद्दल नेटकऱ्यांनी देखील बरेच मिम्स तयार केले होते. या सर्व बाबींवर पंजाब किंग्जनेही एक मिम पोस्ट केले होते. पंजाब किंग्जने आपल्या मिममध्ये वसीम जाफर यांच्याबद्दल एक मत व्यक्त केले होते. यानंतर वसीम जाफर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मिम शेयर केले. जाफर यांच्या या मजेदार मिमवर अनेकांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या असून, अल्पावधीतच हे मिम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते.

आयपीएल 2021 मध्ये वसीम जाफर हे पंजाब किंग्ज संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. मात्र आयपीएल बबलमध्ये देखील कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली. दरम्यान नुकतीच बातमी समोर येत असून त्यानुसार आयपीएल 2021 चे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये युएईमध्ये खेळले जाण्याची दाट शक्यता आहे. या हंगामात पंजाब किंग्जची कामगिरी फारच निराशाजनक झाली होती. स्पर्धा रद्द होईपर्यंत पंजाबला 8 सामन्यात केवळ 3 विजय व तब्बल 5 पराभव स्वीकारावे लागले होते.दरम्यान हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की आयपीएलची पुन्हा सुरुवात झाल्यानंतर पंजाब संघाच्या कामगिरीत सुधारणा होते अथवा नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंका दौऱ्यासाठी हर्षा भोगलेंनी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, पाहा कोणाला दिली संधी

वाढदिवशी पण शास्त्री गुरूजी ट्विटरवर ट्रोल, पाहा काही भन्नाट मिम्स

५ कमनशिबी कर्णधार, ज्यांना केवळ एकाच टी२० सामन्यात मिळाली नेतृत्वाची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---