---Advertisement---

‘मी ही जागा कुठेतरी पाहिलीये’, दिनेश कार्तिकच्या पुनरागमनावर माजी दिग्गजाची प्रतिक्रिया व्हायरल

On: गुरूवार, जून 9, 2022 6:27 PM
Dinesh-Karthik-Shahrukh-Khan
---Advertisement---

आजपासून (९ जून) दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतून भारताचा कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी यांना विश्रांती देण्यात आली आहे. शिवाय सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी केएल राहुल आणि कुलदीप यादवही या मालिकेतून बाहेर गेले आहेत. दुसरीकडे मात्र, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन झाले आहे. 

दिनेश कार्तिकने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१९च्या विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर आता त्याला संघात स्थान मिळाल्याने त्याचे चाहते खूश असल्याचे दिसून येत आहे. अशातच एकेकाळी कार्तिक सोबत सलामीवीर म्हणून खेळायला येणारा भारतीय संघाचा माझी फलंदाज वसिम जाफर याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये शाहरुख खानचा एक डायलॉग आहे. ज्यात शआहरुख बोलत आहे की, “यह जगाह मैने पहले देखी है, मै शायद यहा पर काम कर चुका हू” असे बोलताना दिसत आहे. या व्हिडिओ सोबत वसिमने “दिनेश कार्तिक भारतीय ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर…” असे कॅपशन दिले आहे. वसिमने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्या, कार्तिकने आयपीएल २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी फिनिशर म्हणून ३३० धावा केल्या. यादरम्यान तो १० वेळा नाबाद परतला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे निवडकर्त्यांनी आत्मविश्वास दाखवत त्याला पुन्हा एकदा संधी दिली आहे. वसिम जाफर आणि दिनेश कार्तिक हे खूप जुने मित्र आहेत. २००७ साली झालेल्या  इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या मालिकेत कार्तिक आणि जाफर यांनी सलामीवीर म्हणून मुख्य भुमिका पार पाडली होती. शिवाय भारताच्या विजयात योगदानही दिले होते.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उमरान मलिक पदार्पण करणार? कर्णधार रिषभ पंतने दिले संकेत

आरसीबीच्या वेगवान गोलंदाजाचे रणजी ट्रॉफीत विक्रमी अर्धशतक, ‘एवढ्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी

भविष्यात ‘हा’ फलंदाज बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, हरभजन सिंगने दिले संकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---