हार्दिक पंड्याने आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त पुनरागमन केले आणि गुजरात टायटन्सला विजेतेपद पटकावून दिले. पदार्पणाच्या हंगामात संघाला आयपीएल ट्रॉफी मिळवून देणारा हार्दिक शेन वॉर्ननंतर दुसरा कर्णधार ठरला. कर्णधाराच्या रूपात त्याचे प्रदर्शन पाहून अनेकजण हैराण आहेत. अशातच माजी दिग्गज हरभजन सिंगने असे मत व्यक्त केले आहे की, भविष्यात हार्दिक भारतीय संघाचे देखील नेतृत्व करू शकतो.
आयपीएल २०२२मध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ज्या पद्धतीने खेळला आणि स्वतःच्या संघाचे नेतृत्व केले, ते पाहून निवडकर्त्यांनी त्याला भारतीय संघात पुन्हा संधी दिली आहे. माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) याला वाटते की, हार्दिक भविष्यात भारताचे नेतृत्व देखील करू शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार हरभजन म्हणाला की, “यावर्षी आयपीएमधील सर्वात मोठ्या गोष्टीपैकी गुजरात टायटन्सच्या कर्णधाराच्या रूपात हार्दिक पंड्या राहिला आहे. या प्रतिष्ठित लीगदरम्यान त्याने ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व केले, ते कौतुकास्पद आहे. त्याची जिद्द आणि सकारात्मक नेतृत्व संकेत आहे की, तो भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.”
राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळलेल्या अंतिम सामन्यात हार्दिक पंड्याने गुजरातसाठी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये योगदान दिले. त्याने या सामन्यात ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्याच, पण फलंदाजीमध्येही ३४ धावांचे योगदान दिले. हरभजन माध्यमांशी इतरही विषयांवर बोलला. यावेळी त्याने विराट कोहली (Virat Kohli) लवकरच त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये परतणार असल्याची खात्री व्यक्त केली.
विराटविषयी बोलताना हरभजन म्हणाला की, “विराट कोहली एक असा क्रिकेटपटू आहे, जो मैदानात असतो, तेव्हा नेहमीच सर्वश्रेष्ठ देतो. मागच्या अनेक वर्षांपासून त्याने जे अप्रतिम क्रिकेट खेळले आहे, ते पाहून मला पूर्ण विश्वास आहे की, तो लवकरच पुनरागमन करेल.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय निवडकर्त्यांनी आयपीएलमध्ये प्रभावशाली प्रदर्शन केलेल्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच, यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक देखील खेळला जाणार आहे. हरभजनच्या मते युवा खेळाडूंकडे विश्वचषकाच्या आधी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध स्वतःची गुणवत्ता दाखवण्याची सुवर्णसंधी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलाम तुझ्या समर्पणाला! रक्तबंबाळ पाय घेऊन वॉटसन मुंबईला एकटा भिडलेला
PHOTO। ‘FIH प्रो लीग’च्या सामन्यासाठी भारतीय पुरुष आणि महिला संघ बेल्जियमला रवाना
अशी कामगिरी करणारा ‘होप’ ठरला तिसराच फलंदाज; एकाचवेळी मोडले कोहली, रूटचे विक्रम