भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. मागच्या काही वर्षांमध्ये पंतने केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर त्याने संघात स्वतःचे नियमित स्थान बनवले आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही त्याचे प्रदर्शन अप्रतिम राहिले. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने पंतची तुलाना दिग्गज एमएस धोनी याच्यासोबत केली आहे.
पंत त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय चाहत्यांचा आवडता खेळाडू बनला. तर एमएस धोनी (MS Dhoni) याची लोकप्रियता जगजाहीर आहे. एमएस धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिसाहातील एक महान कर्णधार आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज होता, ज्याने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पंतने त्याच्या कारकिर्दीची सुरूवात धोनीच्या नेतृत्वात केली. धोनीसारखा यष्टीरक्षक फलंदाज संघाला पुन्हा मिळणे खूप मोठी गोष्ट असेल. परंतु वसीम जाफर (Wasim Jaffer) यांच्या मते पंत धोनीपेक्षाही उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज बनू शकतो. पंतने खूप कमी काळात अनेक विक्रम केले आहेत.
धोनीपेक्षा सरस बनू शकतो रिषभ पंत
क्रिकइंफोसोबत केलेल्या चर्चेदरम्यान वसीम जाफर म्हणाला की, “होय, रिषभ पंत असा खेळाडू आहे, जो निश्चितच महेंद्रसिंग धोनीपेक्षा चांगला यष्टीरक्षक फलंदाज बनू शकतो. एवढ्या कमी वयात त्याने आधीच महत्वपूर्ण खेळी केली आहे. मला वाटते की, येणाऱ्या ८-१० वर्षात तो खूप परिपक्व होईल आणि अधिक अनुभवासह एमएस धोनीपेक्षा उत्तम बनू शकतो.”
दरम्यान, नुकतीच श्रीलंकेविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका पार पडली. कसोटी मालिकात दोन सामन्यांची होती आणि त्या दोन्ही सामन्यात पंतने महत्वाची भूमिका पार पाडली. पहिला सामना मोहालीमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये पंतने ९७ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर बेंगलोरमध्ये खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात त्याने अवघ्या २८ चेंडूत अर्धशतक केले आणि भारतीय संघासाठी सर्वात वेगवान अर्धशतक करणारा खेळाडू बनला. यापूर्वी कपिल देव (Kapil Dev) यांच्या नावावर भारतासाठी वेगवान कसोटी अर्धशतक करण्याचा विक्रम होता, पण आता पंतने श्रीलंकेविरुद्धच्या या दुसऱ्या सामन्यात तो मोडला.
महत्वाच्या बातम्या –
केरला ब्लास्टर्स तिसऱ्यांदा फायनलमध्ये; लीग शील्ड विजेत्या जमशेदपूरचे पॅकअप
श्रीलंकन कर्णधाराने शतक झळकावताच विराटने खास अंदाजात केला सलाम; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक