बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 गडी राखून विजय मिळवला. ढाका येथे झालेल्या या सामन्यात भारताने आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्या महत्वपूर्ण खेळीने थरारक विजय मिळवला. मात्र, या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेला केएल राहुल हा फलंदाजीत पूर्णतः अपयशी ठरला. त्याच्या याच खराब कामगिरीनंतर माज भारतीय फलंदाज वसीम जाफर याने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यानंतर राहुल याच्याकडे संघाचे नेतृत्व आले. राहुल हा मालिकेतील पहिल्या चट्टोग्राम कसोटीत चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्याने या कसोटीत दोन्ही डावात अनुक्रमे 22 व 23 धावा केल्या होत्या. तर ढाका कसोटीच्या पहिल्या डावात आठ तर दुसऱ्या डावात दोन धावा करू शकलेला. यामुळे त्याने ही मालिका केवळ 57 धावांसह संपवली. त्याचवेळी त्याने अखेरच्या वेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतासाठी कसोटी सामने खेळले होते. त्यावेळी देखील तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. त्यावेळी त्याने 10,12 व 8 धावा केलेल्या.
त्याच्या याच सातत्याने खराब होत असलेल्या कामगिरीमुळे वसीम जाफर याने त्याच्या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जाफर म्हणाला,
“बांगलादेशमध्ये राहुलची फलंदाज म्हणून कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेत रोहित शर्माने पुनरागमन केले तर, राहुलला खालीच बसावे लागेल.”
भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. दुसरीकडे शुबमन गिल याने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावून संघातील आपली जागा मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राहुलची संघातील जागा डळमळीत होताना दिसतेय.
(Wasim Jaffer Slams KL Rahul For His Poor Performance)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कर्णधार एक सांगतो अन् खेळाडू करतात एक”, संघ सहकारीच टीम इंडियावर भडकला
पेले यांची तब्येत नाजूक, जवळचे व्यक्ती करतायेत हॉस्पिटलमध्ये गर्दी; मुलीची भावूक पोस्ट व्हायरल






