माजी भारतीय सलामीवीर वसीम जाफर ट्विटरवर खूप सक्रिय आहे. भारतीय संघ आणि भारतीय खेळाडूंना कोणी विनाकारण लक्ष केल्यास तो सोशल मीडियावरून प्रत्युत्तर देत असतो. इंग्लंड क्रिकेट संघाचे समर्थक असलेल्या बार्मी आर्मीबरोबरही त्याने असेच काही केले. बार्मी आर्मीने ट्विटर हँडलवरून भारतीय कर्णधार विराट कोहलीचे जाफरसमवेत असलेले जुने छायाचित्र शेअर केले. त्यावरून जाफरने एक मजेदार मीम व कॅप्शन देत बार्मी आर्मीला प्रत्युत्तर दिले.
असे होते छायाचित्र
बार्मी आर्मीने शेअर केलेल्या छायाचित्रामध्ये विराट तिरंदाजासारखे लक्ष्य साधताना दिसत आहे. या पोस्टवर, बार्मी आर्मीने कॅप्शन देत लिहिले, ‘विराट इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर आहे. कारण तो टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीची तयारी करतोय.’
विराट कोहलीची खिल्ली उडवल्यानंतर जाफरने बार्मी आर्मीचा क्लास घेतला. त्याने बार्मी आर्मीच्या पोस्टवर प्रत्युत्तर देताना लिहिले की, ‘बार्मी आर्मी की बारमध्ये आर्मी?’ यासोबतच जाफरने गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटातील एक मीमही या पोस्टसह सामायिक केले. चाहत्यांनाही हे मीम खूप आवडले आणि त्यांनी बार्मी आर्मीची मजा घ्यायला सुरुवात केली.
Barmy Army or Bar mein Army? ???? #ENGvIND #ViratKohli https://t.co/fcD1yTttJf pic.twitter.com/J8cnWVM9YP
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) July 24, 2021
इंग्लंड संघाचा समर्थक गट आहे बार्मी आर्मी
बार्मी आर्मी हा इंग्लंड क्रिकेट संघाच्या समर्थकांचा एक गट आहे. इंग्लंड संघ जेथे-जेथे खेळायला जातो तेथे तेथे बार्मी आर्मीचे सदस्य संघाला प्रोत्साहन देण्यासाठी पोहोचतात. त्यांला अनधिकृतपणे इंग्लंड क्रिकेट संघाचा १२ वा खेळाडू मानला जातो. १९९५ च्या इंग्लंड क्रिकेट संघाच्या दौर्यादरम्यान ऑस्ट्रेलियन माध्यमांनी या गटाला हे नाव दिले होते. त्यावेळी हा गट आयोजित करण्यात आला नव्हता. आता या गटाची नोंदणी इंग्लंडमध्ये झाली आहे.
२००७ पासून भारत जिंकला नाही इंग्लंडमध्ये मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. २००७ पासून भारतीय संघाने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली नाही. यानंतर भारताने इंग्लंडमध्ये तीन कसोटी मालिका खेळल्या असून त्या तिन्ही गमावल्या आहेत. २०११ मध्ये ४-०, २०१४ मध्ये ३-१ व २०१८ मध्ये ४-१ असा भारताला पराभव पत्करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
संपूर्ण वेळापत्रक: उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार अंतिम सामना
आयपीएल २०२१: ‘या’ दिवशी रंगणार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा महामुकाबला
पोलार्डच्या ‘त्या’ निर्णयाने सगळे झाले चकित, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात घडली घटना






