इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकल वॉन हे दरवेळेस कोणत्या-ना-कोणत्या गोष्टींवरून भारतीय संघावर टीका करत असतात. आताही त्यांनी असेच काही केले आहे. परंतु यावर माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने त्यांना जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. तिथे ते येत्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याची तयारी करत आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील हा सामना १८ जून-२२ जून दरम्यान रंगणार आहे.
भारतीय संघाचे आव्हान वाढले आहे
तत्पुर्वी न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्याच मातीत २ सामन्यांच्या कसोटी सामन्यात १ – ० असा पराभव केला आहे. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या आणि शेवटच्या कसोटीच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडने संघाने इंग्लंडला 8 गडी राखून पराभूत केले. लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान खेळलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. परंतु दुसऱ्या सामन्यातून दमदार पुनरागमन करत न्यूझीलंड संघाने भारतापुढील आव्हान वाढवले आहे.
न्यूझीलंडच्या बहाण्याने मायकल वॉनने भारताला केले लक्ष
इंग्लंडच्या पराभवानंतर मायकल वॉनने ट्विट केले होते की,“न्यूझीलंड एक उच्च दर्जाचा संघ आहे. ज्यांनी परिस्थिती अनुकूल फलंदाजी केली. गोलंदाजी देखील उत्कृष्ट केली. तसेच त्यांचे क्षेत्ररक्षणदेखील जबरदस्त होते. मी अशी कल्पना करत आहे की, आता पुढच्या आठवड्यात ते अंतिम सामन्यात भारतीय संघालाही पराभूत करतील.”
NZ are a high class team .. Read the situation with the Bat in hand,skilful with the ball & catch brilliantly .. Really fancy them to beat India next week .. #ENGvNZ
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 13, 2021
वसीम जफरने केले जोरदार ट्रोल
भारताचे माजी सलामीवीर वसीम जाफरने या ट्विटवरुन मायकल वॉनला जोरदार ट्रोल केले आहे. इंग्लंडच्या माजी कर्णधाराची चेष्टा करताना ते म्हणाले, “तुझे काम झाले, तू जा.” या मीमध्ये ‘वेलकम’ चित्रपटाचे डायलॉग लिहिले गेले आहेत. चित्रपटाचे अभिनेता परेश रावल आणि नाना पाटेकर चित्रात दिसले आहेत.
#WTCFinals https://t.co/ixeBDMfAmV pic.twitter.com/Q0nZQU3WvU
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) June 13, 2021
न्यूझीलंडसमोर इंग्लंडला खेळता आले नाही
दुसर्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३०३ धावा केल्या तर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३८८ धावा केल्या आणि ८५ धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडचा दुसरा डाव १२२ धावांवर आटोपला आणि त्यांनी ३७ धावांनी आघाडी घेतली आणि न्यूझीलंडला विजयासाठी ३८ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडने हे लक्ष्य १०.५ षटकांत पूर्ण केले आणि सहज सामना जिंकला. आता न्यूझीलंड १८ जूनपासून भारतासोबत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
विश्वचषकात ‘तू चल मी आलो’चा प्रसंग, इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवघ्या ४५ धावांवर गुंडाळला होता डाव
इंग्लंडवर १-०ने मात करत न्यूझीलंडचा ‘मोठा’ पराक्रम, २२ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला पूर्णविराम
ब्रॉडने निवडली त्याची ‘ऑलटाईम फेवरेट इलेव्हन’, सचिनसह त्याच्या जिगरी मित्रालाही दिली जागा