सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात २०१८ साली दक्षिण आफ्रिकेत घडलेल्या बॉल टेम्परिंग (सॅंडपेपर) प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू आहे. त्यात घटनेत दोषी म्हणून सजा भोगलेला युवा फलंदाज कॅमेरून बेनक्रॉफ्ट याने या प्रकरणाची माहिती असल्याचा गोलंदाजांना होती असा आरोप केला असून, क्रिकेट ऑस्ट्रेलिया नव्याने या प्रकरणाची चौकशी करू शकते. अनेक माजी खेळाडूंनी देखील याला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफर याने याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला.
जाफरने केले असे ट्विट
भारतीय संघाचा माजी सलामीवीर व आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा फलंदाजी प्रशिक्षक वसिम जाफर आपल्या गमतीदार ट्विटसाठी ओळखला जातो. त्याने बॉल टेम्परिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्सवर अप्रत्यक्षपणे टीका केली. जाफरला ट्विटरवर प्रश्न विचारला गेला की, कमिन्स ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार होणे विषयी आपले मत काय आहे? त्या प्रश्नाला उत्तर देताना जाफरने लिहिले, ‘तो प्रमुख दावेदार आहे. मात्र अद्याप त्याचे नाव वाळूवर लिहा, पेपरवर नाही’
कमिन्सला मागील काही काळापासून ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार नेमण्याविषयी चर्चा सुरू आहे. कमिन्स हा सध्या कसोटी क्रमवारीत जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे आणि आयपीएलमध्ये केकेआर संघासाठी खेळतो.
काय होते बॉल टेम्परिंग प्रकरण
सन २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केपटाउन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात कॅमेरून बेनक्रॉफ्ट कॅमेर्यामध्ये चेंडूवर सॅंडपेपर घासताना पकडला गेला होता. यानंतर त्याच्यावर ९ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. कर्णधार स्टीव स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरही दोषी आढळले. या दोन खेळाडूंवर एक वर्षाची बंदी घातली गेलेली. यानंतर स्टीव स्मिथला कर्णधारपदही गमावावे लागले. त्यानंतर आजही स्मिथला कर्णधारपद मिळालेले नाही.
त्या सामन्यात मिचेल स्टार्क, जोस हेझलवुड, पॅट कमिन्स, नॅथन लियोन आणि मिचेल मार्श हे गोलंदाज खेळले होते. अशा परिस्थितीत हे सर्व संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“मला खर काय आहे ते माहीत आहे,” बॉल टेंपरींग प्रकरणात डेविड वॉर्नरच्या मॅनेजरचा मोठा खुलासा
भारताने जिथे विश्वचषक जिंकला, त्याच वानखेडे स्टेडियमचे तौक्ते वादळाने केले हाल; पाहा व्हायरल फोटो
दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा टी२० विश्वचषक खेळण्यापासून राहू शकतो वंचित, जाणून घ्या कारण






