---Advertisement---

पंजाब किंग्जच्या प्लेइंग ११वरून भारताच्या माजी दिग्गजाने घेतली फिरकी, शेअर केला फिल्मी व्हिडिओ

On: शुक्रवार, एप्रिल 8, 2022 7:45 PM
Punjab-Kings
---Advertisement---

आयपीएल २०२२चा १६वा सामना शुक्रवारी (८ एप्रिल) खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघ आमने- सामने आहेत. पंजाब किंग्जला या हंगामात मयंक अगरवालच्या रूपात नवीन कर्णधार मिळाला आहे आणि त्याने तीन पैकी दोन सामने जिंकवून दिले आहेत. आता चौथ्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जसमोर त्यांच्या प्लेइंग इलेव्हनसंदर्भात पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर वसीम जाफरने संघाची फिरकी घेतली आहे.

पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अगरवालसमोर गुजरातसोबतच्या या सामन्यासाठी भक्कम प्लेइंग इलेव्हनची निवड करण्याचे आव्हान होते. संघात अनेक असे विदेशी खेळाडू आहेत, जे सध्या त्यांच्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. पण त्या सर्वांना एकत्र प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकत नाही. कारण आयपीएलच्या नियमांनुसार प्लेइंग इलेव्हनमध्ये एका वेळी जास्तीत जास्त ४ विदेशी खेळाडूंना निवडले जाऊ शकते.

याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फलंदाज वसीम जारफ (Wasim Jaffer) याने एक खास फिल्मी व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहे. हा व्हिडिओ बॉलिवूडचा विनोदी चित्रपट हेराफेरीमधील आहे. यामध्ये ओम पुरीसह इतर अभिनेते एका गाडीत एकत्र बसण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जागा कमी असल्यामुळे हे शक्य होत नाहीय.

हा विनोदी व्हिडिओ जाफरने त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “पंजाब किंग्जने त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षा आणि ओडियन स्मिथला सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहे.

पंजाब किंग्जकडे एकूण ७ विदेशी खेळाडूंचे पर्याय उपलब्ध आहेत. जाफरने ज्या खेळाडूंची नावे शेअर केली आहेत, त्याव्यतिरिक्त पंजाबकडे बेनी होवेल आणि नेथन एलिस हे विदेशी खेळाडूही आहेत. आयपीएलच्या नियमांनुसार एका संघात जास्तीत जास्त ८ विदेशी खेळाडू असू शकतात आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यापैकी फक्त ४ विदेशी खेळाडू सहभाग घेऊ शकतात. अशात पंजाब किंग्जने गुजरातविरुद्धच्या सामन्यात ४ परदेशी खेळाडूंना संघात घेतले आहे. त्यात लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, ओडियन स्मिथ आणि कागिसो रबाडा यांना संधी दिली आहे.

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

Maharashtra Kesari | मोठी बातमी! साताऱ्यात अवकाळी पाऊस, महाराष्ट्र केसरी स्पर्धा तात्पुरत्या स्थगित

Video: नॉर्कियाच्या वेगवान चेंडूवर डी कॉकने ठोकला विचित्र षटकार; पाहून तुम्हालाही फुटेल घाम

Video: आयुष बदोनीच्या ३ चेंडूतील वादळी खेळीने वेधले लक्ष! चाहत्यांना आली धोनी-विराटची आठवण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---