---Advertisement---

‘ऍशेसबद्दल काही ट्वीट का नाही केले?’ चाहत्याच्या प्रश्नावर जाफरचं मन जिंकणारं उत्तर

---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटर आणि सलामीवीर फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते नेहमी मजेशीर ट्विट करून नेहमी सगळ्यांचं मनोरंजन करत असतात. सध्या क्रिकेटमधली मोठी ऍशेस मालिका (The Ashes) सुरु आहे आणि जाफर यांनी त्यावर काही ट्विट न केल्याने चाहत्यांच्या मनात एक उत्सुकता होती, त्यावर आत जाफर यांनी मजेशीर ट्विट केलं आहे.

सध्याच्या ऍशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना ८ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये गाबा (Gabba) मैदानावर खेळवण्यात आला होता. ऍशेस मालिका (The Ashes Series) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) मध्ये होणारी क्रिकेटमधली ऐतिहासिक मालिका आहे.

जेव्हा वसीम जाफरने ऍशेस मालिकेबद्दल काही ट्विट केले नाही, तेव्हा एका चाहत्याने त्यांना याबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले की त्यांना ऍशेसपेक्षा विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) जास्त रस आहे. जाफरचं उत्तर असं होतं, ‘खरं सांगतो मला सध्या ऍशेसपेक्षा विजय हजारे ट्रॉफीमध्ये रस आहे.’ आणि त्यांनी त्या ट्विटमध्ये क्रिकेट ओडिशाला (Odisha Cricket Team) टॅग सुद्धा केलं.

४३ वर्षीय वसीम जाफर क्रिकेट ओडिशाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांची नियुक्ती जुलै महिन्यातच झाली आहे. जाफरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिग्गज म्हणून मानलं जातं. याआधी ते उत्तराखंडचे प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांनी मुंबईच्या प्रशिक्षक पदासाठी देखील अर्ज केला होता, पण पुढे काही झालं नाही.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये ओडिशाची चांगली सुरुवात झाली आहे. त्यांनी एलिट गट अ मधून सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. सध्या ओडिशा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. विदर्भ (Vidarbha) संघाचा नेट रन रेट चांगला असल्यामुळे ते ओडिशाच्यावर आहे.

तसेच ऍशेसबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ९ विकेट्सने हरवले. इंग्लंडने पहिल्या डावांत १४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४२५ धावा केल्या आणि इंग्लंडला दुसऱ्या डावांत २९७ धावांत गुंडाळले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला २० धावांचे आव्हान मिळाले होते. ऑस्ट्रेलियाने १ विकेट गमावत २० धावा करून सहज विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या – 

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३:  दादा गुडनाईट बोलून निघून गेला, परंतु युवराज मात्र पूरता घाबरला

‘एव्हरयंग’ ताहिर श्रीलंकेत करतोय मन जिंकणार काम; स्वत: केला खुलासा

‘या’ फलंदाजाचा खराब फॉर्म सुरूच; भारतीय संघातील पुनरागमनावर प्रश्नचिन्ह

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---