भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार. मात्र, वनडे मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर केला गेला नाही.
भारताचा उत्कृष्ट सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) बऱ्याच काळापासून भारतीय संघापासून लांब आहे. श्रीलंका दौऱ्यावर तो संघाचा कर्णधार होता. कारण, विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बाकीचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर होते. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. काही दिवसांपूर्वी असे सांगण्यात येत होते की, धवनला वनडे संघात सामील करण्यात येईल. धवनला संघात परत जागा मिळवण्यासाठी विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ (Vijay Hazare Trophy 2021-22) या स्पर्धेच्या रूपाने एक सुवर्णसंधी चालून आली आहे. मात्र, धवन या संधीचे अजून तरी सोने नाही करू शकला.
चंदीगढच्या सेक्टर १९ स्टेडियममध्ये विजय हजारे ट्रॉफीचा दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश (Delhi vs Uttar Pradesh) सामना खेळवला गेला. धवनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, धवन मोठी खेळी खेळू शकला नाही. दिल्ली संघाने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ध्रुव शोरेला (Dhruv Shorey) गमावले. त्याच्या विकेटनंतर धवन संघाला सांभाळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु, धवन फक्त १४ धावा करून बाद झाला. त्याने फक्त २२ चेंडूंचा सामना केला. नवव्या षटकात पहिल्या चेंडूवर धवन बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या फक्त २८ होती.
अनुज, ललितने सांभाळला डाव
धवन परतल्यानंतर हिंमत सिंग (Himmat Singh) आणि जॉन्टी सिद्धू (Jonty Sidhu) यांनी संघाला सांभाळलं. हिंमत सिंग ४२ धावा करून तसेच जॉन्टी सिद्धू ३० धावा करून बाद झाला. क्षितिज शर्मा (Kshitiz Sharma) फक्त ७ धावा करू शकला. यष्टीरक्षक अनुज रावतने (Anuj Rawat) ५० आणि ललित यादवने (Lalit Yadav) ५७ धावा करत डाव सांभाळला. या दोघांच्या विकेटनंतर बाकी फलंदाज सुद्धा पटापट बाद झाले. दिल्लीचा संघ ४९ षटकांत २४३ धावांवर सर्वबाद अशी धावसंख्या करू शकला. याआधीसुद्धा धवन झारखंड आणि हैदराबाद विरुद्ध चांगली खेळी नाही खेळू शकला. झारखंड विरुद्ध त्याला भोपळा देखील फोडता आला नाही तसेच हैदराबाद विरुद्ध फक्त १२ धावा करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताची ‘अनलकी त्रिमूर्ती’! ज्यांना मिळायला हवी होती दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी
“२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराट खचलेला”; माजी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
अबब! ३९९ ते ४०० कसोटी विकेट्सपर्यंतचा प्रवास करण्यासाठी नेथन लायनला लागले तब्बल ३२६ दिवस