विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजिनामा देताच रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करणारा रोहित शर्मा आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील कर्णधार आहे. तो कर्णधार झाल्यानंतर एकही सामना पराभूत झाला नाही. यानंतर त्याचे कौतुक केले जात आहे. माजी फलंदाज वसीम जाफर यांनी रोहितबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. (Wasim Jaffer’s big prediction about Rohit Sharma)
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांविरुद्ध टी२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तसेच संघांने श्रीलंकेला टी२० नंतर कसोटी मालिकेत सुद्धा क्लीन स्वीप दिला आहे. श्रीलंकेला मोहाली कसोटीत भारताने १ डाव आणि २२२ धावांनी पराभूत केले आहे आणि बंगळुरू कसोटीत भारताने श्रीलंकेला २३८ धावांनी पराभूत केले आहे.
रोहितच्या या सर्वोत्तम खेळीनंतर भारताचे माजी दिग्गज वसीम जाफर यांनी रोहितबाबत भविष्यवाणी केली आहे. रोहित हा कसोटी क्रिकेटमध्ये विराट पेक्षा चांगला कर्णधार होऊ शकतो, असे ते म्हणाले आहेत.
वसीम जाफर यांनी सांगितले की, “रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा चांगला कसोटी कर्णधार बनू शकतो. हे माहित नाही की तो किती कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार असेल? परंतु मला वाटते की तो सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक आहे आणि आपण याचे उदाहरण पाहत आहोत की, त्याने सर्व मालिंकामध्ये विरुद्ध संघांना पराभूत केले आहे. आता असे वाटत आहे की, संघाची कमान योग्य व्यक्तीच्या हातात आली आहे.”
कोहलीची कर्णधार म्हणून कारकीर्द
कोहली सध्या भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ६८ कसोटींपैकी ४० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याची सरासरी या दरम्यान ५९ एवढी आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला होता. ऑस्ट्रेलियाला मायदेशात धूळ चारत इतिहास रचला होता. विराटने २०२१ च्या शेवटी टी२० च्या कर्णधारपदाचा राजिनामा दिला तर त्याला एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरून दूर करण्यात आले आणि २०२२ च्या सुरुवातीला त्याने कसोटी कर्णधारपदाचा राजिनामा दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! बायो बबल तोडल्यास खेळाडूवर एका सामन्याची बंदी, आयपीएल २०२२साठी बनली कडक नियमावली
‘आऊट ऑफ फॉर्म’ विराटला बालपणीच्या प्रशिक्षकांनी दिला कामाचा सल्ला; म्हणाले, ‘अकादमीत परत ये’
पीवायसी रिबाउंड रॅकेट लीग २०२२ स्पर्धेत मस्किटर्स संघाला विजेतेपद