ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर अनेकदा आपल्या सोशल मिडीया पोस्ट आणि इंस्टाग्राम रिल्स वरून चर्चेत असतो. विशेषत: भारतीय गाण्यांवरील नृत्य आणि भारतीय चित्रपटांमधील दृश्ये. अशीच एक पोस्ट त्याने सध्या त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये वॉर्नर त्याच्या मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे.
डेविड वॉर्नर (David Warner) याने नुकतेच एका लोकप्रिय गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने ‘जुग-जुग जिओ’ या हिंदी चित्रपटातील ‘नच पंजाबन’ या गाण्यावर त्याचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी आणि वरुन धवन हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. डेविडने या व्हिडिओला ‘आम्ही परतलो आहोत’, असे कॅप्शन देत वरुणला टॅग केले आहे.
वॉर्नरच्या या व्हिडिओमध्ये त्याच्या मुलीही डान्स करताना दिसत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की केवळ वॉर्नरच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला भारतीय सिनेमा आवडतो. या गाण्याला इंस्टाग्रामवर 4 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.
View this post on Instagram
वॉर्नरने यापूर्वी भारतीय चित्रपट पुष्पा: द राइज यामधील प्रसिद्ध संवाद ‘मैं झुकेगा नही साला’ याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंट अशा अनेक व्हिडिओंनी भरलेले तुम्हाला दिसेल. हे व्हिडिओ चाहत्यांना सर्वाधिक आवडलेही आहे. भारतीय चाहत्यांकडून कांगारू क्रिकेटरच्या या व्हिडिओंना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वॉर्नरने आयपीएलच्या दरम्यान भारतीय चित्रपटातील गाण्याचे, संवादांचे अनेक व्हिडिओ शेयर केले आहेत. त्यामुळे त्याच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाल्याचे दिसले आहे. वॉर्नरचे त्याच्या मुलींवर खूप प्रेम आहे. याचे एक उदाहरण आयपीएलच्या वेळी पाहायला मिळाले, जेव्हा वडिलांच्या लवकर बाद झाल्यानंतर मुली उदास दिसत होत्या. त्याचवेळी, मुलींनी वडिलांकडे तक्रार केली होती की, जोस बटलर आयपीएलमध्ये सतत शतके झळकावत आहे, तुम्हाला हे जमत नाही. त्यावेळी या बाप-लेकीं मधील प्रेम जगासमोर आले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फाॅर्मात नसलेल्या कोहलीसाठी इंग्लंडच्या कॅप्टनची फलंदाजी; म्हणाला, ‘तुम्ही असे कसे….’
‘बुमराहपेक्षा कमी नाही आफ्रिदीचा जावई’, माजी क्रिकेटपटूचे मोठे भाष्य
भारताचा टर्मिनेटर हरभजन सिंग करणार क्रिकेट मैदानात पुनरागमन, पाहा कधी आणि कोणता सामना खेळणार