---Advertisement---

Video: कर्णधार विराट कोहलीने केले टीम इंडियाच्या चाहतीला खुश!

On: गुरूवार, जुलै 19, 2018 7:52 PM
---Advertisement---

लीड्स। मंगळवारी (17 जुलै) इंग्लंड विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

या पराभवाने भारतीय चाहत्यांची जरी निराशा झाली असली तरी या सामन्याच्या आधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या इंग्लंडमधील एका चाहतीला आनंद दिला आहे.

झाले असे की तिसऱ्या वनडेसाठी भारतीय खेळाडू मैदानावर जात असताना एक चाहती बाहेर उभी होती. ती खेळाडूंकडून अॅटोग्राफची अपेक्षा करत होती. मात्र बाकी खेळाडूंनी तिला नकार दिला. पण विराटने क्षणाचाही विचार न करता तिला अॅटोग्राफ देऊन तिची इच्छा पूर्ण केली.

विराटने या मालिकेत चांगला खेळ करताना दोन अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने बुधवारी आयसीसीने जाहिर केलेल्या वनडे क्रमवारीत फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखताना वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च गुण मिळवले आहेत. त्याचे आता वनडे क्रमवारीत 911 गुण झाले आहेत. त्यामुळे तो सर्वकालीन वनडे क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आला आहे.

इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका 1 आॅगस्टला सुरु होणार आहे. त्यामुळे आता काही दिवस भारतीय संघाला विश्रांती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला अडकले मोठ्या संकटात

एमएस धोनीवर गौतम गंभीरची कठोर शब्दात टिका

‘त्या’ सेलिब्रेशनचा जो रुटला झाला पश्चाताप!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment