येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Indian Premier league 2022) स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये आयपीएल २०२२ स्पर्धेचा लिलाव सोहळा पार पडला. या लिलावात सर्व १० संघांनी एकूण ६०० खेळाडूंवर बोली लावली. यापैकी २०४ खेळाडूंवर यशस्वी बोली लागली. या लिलावाची सुरुवात ह्यूज एडमिड्स यांनी केली होती. परंतु लिलाव प्रक्रिया सुरू असताना त्यांना चक्कर आली होती. त्यांच्याऐवजी चारू शर्मा (Charu Sharma) यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. दरम्यान लिलावात चारू शर्मांकडून एक मोठी चूक घडली होती. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयपीएल लिलावात खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्यासाठी जोरदार स्पर्धा रंगली होती. या लिलावात अनेक युवा खेळाडूंनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली. तर अनेक दिग्गजांना खाली हात परतावे लागले. दरम्यान खलील अहमदची बोली सुरू असताना, चारू शर्मांकडून एम मोठी चूक घडली होती.
तर झाले असे की, खलील अहमदला आपल्या संघात स्थान देण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली होती. आगामी हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसून आला असता, परंतु चारू शर्मांकडून झालेल्या चुकीमुळे तो दिल्ली कॅपिटल्स संघात गेला.
https://twitter.com/addicric/status/1493204701881323526?s=20&t=zkf52esI0NQEa-24zTdogA
खलील अहमदची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने ही बोली ५ कोटीपर्यंत पोहचवली होती. त्यानंतर मुंबईने ५.२५ कोटींची बोली लावली. ही बोली लागताच चारू शर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्स कडे पाहिले. दिल्ली कॅपिटल्स कडून बोली लावली गेली होती, परंतु त्यांनी त्वरित बोली मागे घेतली. मुंबई कडे ५.२५ लाखांची बोली होती. परंतु चारू शर्मा यांनी ही बोली दिल्ली कॅपिटल्सच्या नावे केली.
महत्वाच्या बातम्या :
आज ईडन गार्डन्सवर रंगणार भारत – वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना, ‘अशी’ असू शकते प्लेइंग ११