इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ४२ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात अबु धाबीच्या मैदानावर झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत पंजाबने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १३५ धावा केल्या. पंजाबच्या डावादरम्यान मुंबईचा अष्टपैलू कृणाल पंड्या याने आपल्या एका कृतीने सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
तर झाले असे की, पंजाबचा डाव सुरू असताना सहावे षटक टाकण्यासाठी अष्टपैलू कृणाल आला होता. त्याने आपल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर पंजाबचा सलामीवीर मनदिप सिंगला पायचित करत संघाला पहिले यश मिळवून दिले होते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल फलंदाजीसाठी आला होता.
कृणालच्या याच षटकातील पाचव्या चेंडूवर गेलने समोरच्या दिशेने जोराने फटका मारला. त्याचा हा चेंडू धाव घेण्याच्या तयारीत असलेल्या नॉन स्ट्राईकवरील केएल राहुलच्या पायाला जाऊन धडकला. इतक्यात चेंडू उडून कृणालच्या हातात आला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता तो चेंडू उचलला आणि यष्टीवर जोराने फेकला. त्याने फेकलेला चेंडू अगदी अचूक यष्टीला जाऊन लागला.
यावर त्याने लगेचच पंचांकडे धावबादसाठी अपील केली. पंच मात्र या निर्णयाबाबतीत थोडे गोंधळलेले दिसले. त्यामुळे त्यांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे देण्याचे ठरवले. इतक्यात कृणालने आपली अपील मागे घेतली. त्याच्या या निर्णयावर अगदी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेही सहमती दर्शवली.
कृणाल आणि रोहितची ही खेळाडूवृत्ती पाहून स्वत: राहुलही खुष झाला. त्याने रोहितला थम्स अप दाखवत त्यांचे कौतुक केले. केवळ राहुलच नव्हे तर कृणालच्या या कृतीने चाहत्यांचीही मने जिंकली आहे. अनेकांनी कृणालचा हा व्हिडिओ पोस्ट करत त्याची प्रशंसा केली आहे.
https://twitter.com/Chefly_abhinav/status/1442860749777371146?s=20
DO NOT MISS: Spirit of Cricket, courtesy @mipaltan & @PunjabKingsIPL 👏 👏 #VIVOIPL #MIvPBKS
Here's what happened 🎥 🔽https://t.co/PpAB6tgYbk
— IndianPremierLeague (@IPL) September 28, 2021
असे असले तरीही, राहुल या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. तो सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर कायरन पोलार्डचा बळी ठरला. पोलार्डच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने त्याला झेलबाद केले. त्यामुळे त्याला या डावात फक्त २१ धावांचे योगदान देता आले.
महत्त्वाच्या बातम्या-
जडेजा, इरफाननंतर फक्त अष्टपैलू कृणाललाच जमलाय आयपीएलमधील ‘हा’ पराक्रम, वाचा सविस्तर
रोहितसारखा दिसणारा व्यक्ती पाकिस्तानात पितोय सरबत; फोटोने वेधले सोशल मीडियाचे लक्ष