चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेला आयपीएल २०२२ मधील २९ वा सामना रोमांचक राहिला. या सामन्यात चेन्नईने सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडू यांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ५ बाद १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.५ षटकातच ७ विकेट्स गमावत चेन्नईने लक्ष्य पूर्ण केले आणि ३ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान गुजरातचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याच्या भेदक चेंडूने चेन्नईच्या अंबाती रायुडूची बॅट मोडली होती.
ही घटना चेन्नईच्या डावातील (CSK vs GT) १३ व्या षटकादरम्यान घडली. गुजरातकडून फर्ग्युसन (Lockie Ferguson) हे षटत टाकत होता. त्याने या षटकातील तिसरा चेंडू यॉर्कर टाकला. परंतु त्याचा चेंडू इतका खरतनाक होता की, रायुडूने हा चेंडू हिट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या बॅटची कडा तुटून (Ambati Rayudu Bat Break Down) पडली. नंतर फर्ग्युसनने स्वत: रायुडूच्या बॅटचा तुटलेला भाग उचलून रायुडूला दिला. त्यानंतर रायुडूने बॅट बदलून घेतली.
मात्र पुढे रायुडू जास्ट वेळ मैदानावर टिकू शकला नाही. पंधराव्या षटकात अल्झारी जोसेफने त्याची विकेट काढली. रायुडू ३१ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ४६ धावा करून बाद झाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://twitter.com/JamesTyler_99/status/1515709408457924609?s=20&t=9V7ovMgJ9EfaGrwm_SfqMg
Breaking bat: Ferguson's pace cracks Rayudu's bat https://t.co/43IH35lVyP
— Sumit Sundriyal 🇮🇳 (@SumitSun14) April 17, 2022
Lockie Ferguson breaks Ambati Rayudu's bat. pic.twitter.com/l6OcWl9uBn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 17, 2022
ऋतुराजचे अर्धशतक व्यर्थ
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. विशेष म्हणजे, पहिल्या ५ हंगामात ऋतुराजला खास कामगिरी करता आली नव्हती. मात्र, गुजरातविरुद्ध त्याने अर्धशतक लगावले. त्याने ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. यामध्ये ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. तसेच, अंबाती रायुडूने ४६ धावा चोपल्या. याव्यतिरिक्त रवींद्र जडेजाने २२ आणि शिवम दुबेने १९ धावांचे योगदान दिले. ऋतुराजने अर्धशतक करूनही ते व्यर्थ ठरले.
मिलर आणि राशिद ठरले गुजरातचे तारणहार
चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून फलंदाजी करताना डेविड मिलरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५१ चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या. या धावा करताना त्याने ६ षटकार आणि ८ चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त प्रभारी कर्णधार राशिद खानने ४० धावा चोपल्या. मिलर आणि राशिदच्या खेळीमुळे गुजरातने हा सामना खिशात (GT Beats CSK) घातला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मानहानीकारक पराभवानंतर जडेजा झाला व्यक्त; म्हणाला, त्या कारणामुळे आम्ही हरलो
झहीर-बुमराह-आरपी कोणालाही न जमलेला कारनामा फक्त भुवीने केलाय