Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

झहीर-बुमराह-आरपी कोणालाही न जमलेला कारनामा फक्त भुवीने केलाय

April 18, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
bhuvi 150

Photo Courtesy: Twitter/IPL


आयपीएलमध्ये (IPL 2022) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रविवारी (१७ एप्रिल) झाला. सनरायझर्स हैदराबादने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. हा त्यांचा हंगामातील चौथा विजय होता. उमरान मलिक व भुवनेश्वर कुमार यांनी भेदक गोलंदाजी करत पंजाबला मोठ्या धावसंख्येपासून रोखले होते. त्यानंतर फलंदाजांनी शानदार कामगिरी करत सहज सामना खिशात घातला. या सामन्यात तीन बळी मिळवणाऱ्या अनुभवी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने एक खास आयपीएल विक्रम आपल्या नावे जमा करून घेतला आहे.

भूवीची शानदार गोलंदाजी

सनरायझर्स हैदराबादचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असलेल्या भुवनेश्वर कुमारने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने आपल्या चार षटकांत ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌अवघ्या २२ धावा देऊन तीन महत्त्वाचे बळी मिळवले. यामध्ये सलामीवीर शिखर धवन, तुफानी अर्धशतकी खेळी करणारा लियाम लिव्हिंगस्टोन व शाहरुख खान यांचा समावेश होता. या तीन बळींसह भुवनेश्वरने आपल्या आयपीएल कारकिर्दीत १५० बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय आणि एकूण सातवा गोलंदाज ठरला आहे. तसेच, एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज आहे.

त्याच्याआधी भारताच्या अमित मिश्रा, हरभजन सिंग, पियुष चावला व युजवेंद्र चहल यांनी आयपीएलमध्ये १५० पेक्षा जास्त बळी मिळवले आहेत. तर ड्वेन ब्रावो व लसिथ मलिंगा यांनी अशी कामगिरी नोंदवली आहे.

भुवनेश्वर कुमारने २०११ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियासाठी खेळताना आयपीएल पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १३८ सामने खेळताना ७.३२ च्या इकॉनॉमी रेटने १५० बळी मिळवले आहेत. या दरम्यान त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी १९ धावा देऊन ५ बळी अशी राहिली आहे. त्याने दोन आयपीएल हंगामात सर्वाधिक बळी मिळवत पर्पल कॅप आपल्या नावे केली होती. तसेच त्याने काही सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व देखील केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुजाराला इंग्लंड मानवलं! काउंटी डेब्यूत ठोकली नाबाद डबल सेंचुरी; सामना वाचवला 

वडिलांच्या चुकीमुळे ‘रोहन’चा झाला ‘केएल राहुल’; वाचा भारताच्या या यष्टीरक्षकाच्या आयुष्यातील माहित नसलेले किस्से 

आयपीएलच्या महासंग्रामाला आजच्या दिवशी झाली होती सुरुवात; ब्रेंडन मॅक्युलमने तब्बल १५८ धावा करत गाजवला होता दिवस 


ADVERTISEMENT
Next Post
Ravindra-Jadeja

मानहानीकारक पराभवानंतर जडेजा झाला व्यक्त; म्हणाला, त्या कारणामुळे आम्ही हरलो

Delhi-Capitals

मोठी बातमी! दिल्लीचा संपूर्ण संघ क्वारंटाईन, फिजिओनंतर एका खेळाडूलाही कोरोना; IPL कोरोनाच्या कचाट्यात?

Ambati-Rayudu-Bat-Break-Video

तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.