Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठीत माहिती- क्रिकेटर केएल राहूल

April 18, 2022
in खेळाडू, क्रिकेट
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


संपुर्ण नाव- कन्नौर लोकेश राहूल

जन्मतारिख- 18 एप्रिल, 1992

जन्मस्थळ- बेंगलोर, कर्नाटक

मुख्य संघ- भारत, बेंगलोर ब्रिगॅडियर्स, 19 वर्षांखालील भारतीय संघ, 23 वर्षांखालील भारतीय संघ, कर्नाटक, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन कॉल्ट्स एकादश, किंग्स इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दक्षिण विभाग, सनराइजर्स हैद्राबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 26 ते 30 डिसेंबर, 2014, ठिकाण – मेलबर्न

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 11 जून, 2016, ठिकाण – हरारे

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 18 जून, 2016, ठिकाण – हरारे

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 43, धावा- 2547, शतके- 7

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 42, धावा- 1634, शतके- 5

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 56, धावा- 1831, शतके- 2

थोडक्यात माहिती-

-केएल राहूलची आई राजेश्वरी या मेंगलोर विद्यापीठामध्ये प्राध्यापिका आहेत. तर वडिल डॉ. केएन लोकेश एनआयटी सुरथकाल येथील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात प्राध्यापक आहेत. राहूल हा त्याच्या परिवारातील एकमेव क्रिकेटपटू आहे.

-राहूलला टॅट्यू काढण्याची आवड आहे. त्याच्या अंगावरती 7 टॅट्यू आहेत.

– 2013 मध्ये राहूलने आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आता तो पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार बनला आहे.

-राहूल 2013 सालच्या रेड बूल कॅम्पस क्रिकेट हंगामात खेळला होता आणि तो हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने कर्नाटककडून 1033 धावा करत संघाला रणजी ट्रॉफी जिंकण्यात मदत केली होती.

-देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीने त्याला 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली.

-राहूल हा त्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात सलामीला फलंदाजी करताना शतक केले आहे. त्याच्याव्यतिरिक्त सुरेश रैना आणि रोहित शर्माने सलामीला फलंदाजी करताना तिन्ही स्वरूपात शतके केली आहेत.

-राहूलने 2014 मध्ये दुलिप ट्रॉफीत दक्षिण विभागकडून खेळताना पहिल्या डावात 185 धावा आणि दुसऱ्या डावात 130 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रयत्नानंतरही दक्षिण विभागाने तो सामना 9 धावंनी गमावला होता.

-ऑगस्ट 2013 मध्ये सिंगापूरमधील एसीसी इमर्जिंग चषकात भारतीय संघात राहूलची निवड झाली होती. सर्व देशांनी त्यांचे 23 वर्षांखालील संघ या चषकासाठी पाठवले होते. यावेळी 23 वर्षांखालील पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात त्याने नाबाद 93 धावा केल्या होत्या आणि संघाला विजय मिळवून दिला होता.

-राहूलने सनराइजर्स हैद्राबादकडून खेळत असताना डेल स्टेन यांना आपल्या शैलीने प्रभावित केले होते. त्यांनी म्हटले होते की, राहूल नक्की एमएस धोनीच्या नेतृत्वीखाली खेळेल आणि तसे झालेही.

-राहूल त्याचा क्रिकेट आदर्श राहूल द्रविडप्रमाणे संकटावेळी संघाला वाचवणारा खेळाडू बनला. त्याने गेल्या काही वर्षात अनेक स्थानांवर फलंदाजी केली आहे आणि रिषभ पंतपेक्षाही चांगले यष्टीरक्षण तो करत आहे.

-भारताचा सलामीवीर फलंदाज राहूलने आयपीएल 2018 मध्ये दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. यात त्याच्या 4 षटकारांचा आणि 6 चौकारांचा समावेश होता. हे आयपीएलमध्ये केले गेलेले सर्वात जलद अर्धशतक ठरले.

-राहूलने 2 फेब्रुवारी 2020 ला भारताचा कर्णधार विराट कोहलीचा टी20 द्विपक्षीय मालिकेतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आहे. राहूलने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात हा विक्रम केला आहे.


ADVERTISEMENT
Next Post
bhuvi 150

झहीर-बुमराह-आरपी कोणालाही न जमलेला कारनामा फक्त भुवीने केलाय

Ravindra-Jadeja

मानहानीकारक पराभवानंतर जडेजा झाला व्यक्त; म्हणाला, त्या कारणामुळे आम्ही हरलो

Delhi-Capitals

मोठी बातमी! दिल्लीचा संपूर्ण संघ क्वारंटाईन, फिजिओनंतर एका खेळाडूलाही कोरोना; IPL कोरोनाच्या कचाट्यात?

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.