विशाखापट्टनम मैदानावर काल (दि. 31 मार्च) रोजी झालेला सामना हा सर्वांसाठीच संस्मरणीय ठरलाय. याचे कारण सर्वच क्रिकेटरसिकांना त्यांचा 19 वर्षांपूर्वीचा ‘माही’ मैदानावर खेळताना दिसला. तसेच लांब केस, तीच फटकेबाजी आणि मैदानही तेच. दिल्ली विरुद्ध चेन्नई दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना त्यांचा विंटेज धोनी पाहायला मिळाला. वाऱ्यावर उडणारे केस आणि तुफान फटकेबाजी करणारा धोनी अशी प्रतिमा मनात कोरलेल्या करोडो चाहत्यांना रविवारी त्यांचा हा धोनी पुन्हा त्याच अवतारात पाहायला मिळाला आणि सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
आयपीएल 2024 मधील 13वा सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. हा सामना जरी दिल्ली कॅपिटल्स संघाने 20 धावांनी जिंकला असला, तरीही सामन्याअखेर सर्वांची मने जिंकली ती महेंद्रसिंग धोनीने. या सामन्यात दिल्लीच्या संघाने 5 बाद 191 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 6 बाद 171 धावा केल्या. त्यामुळे सीएसकेचा पराभव झाला. ( Watch MS Dhoni Last Over Fireworks Video CSK vs DC Dhoni Slams 37 Not Out Off 16 On IPL 2024 )
सामन्यात सीएसकेचा जरी पराभव झाला असला तरीही चाहते मात्र नाराज नव्हते. कारण त्यांना त्यांचा लाडका माही अर्थात महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा जुन्या अंदाजात दिसून आला. धोनीला सीएसकेला विजय मिळवून देता आला नाही, पण त्याने 16 चेंडूत तब्बल 37 धावा कुटल्या. त्यात 4 चौकार आणि 3 खणखणीत षटकारांचा समावेश होता. धोनीची ही खेळी पाहून चाहते पुन्हा त्याच्यावर फिदा झालेत. अन् पुन्हा त्याच्या प्रेमातही पडले.
पाहा धोनीच्या तुफान फटकेबाजीचे व्हिडिओ –
There is nothing beyond Thala’s reach 🔥💪 #IPLonJioCinema #Dhoni #TATAIPL #DCvCSK pic.twitter.com/SpDWksFDLO
— JioCinema (@JioCinema) March 31, 2024
WHAT YEAR IS THIS? WHAT IS HAPPENING? WE’RE ABSOLUTELY OUT OF WORDS! #IPLonJioCinema #Dhoni #TATAIPL #DCvCSK pic.twitter.com/RQxe5GKuWg
— JioCinema (@JioCinema) March 31, 2024
अधिक वाचा –
– जबरदस्त ऋषभ! 4 चौकार अन् 3 गगनचुंबी षटकार…अपघातातून परतल्यानंतर ठोकलं पहिलं अर्धशतक
– अद्भुत, अविश्वसनीय!….बेबी मलिंगानं एका हातानं पकडला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’, पाहा VIDEO
– राशिद खानची गुजरातसाठी मोठी कामगिरी, मोहम्मद शमीचा विक्रम मोडला