भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी २८ जून रोजी रवाना झाला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच या संघाचे नेतृत्वपद विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघ मुंबईत विलगीकरणात होता. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेच्या दिशेने रवाना झाला आहे. याबाबतची माहिती खेळाडूंनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली आहे.
भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. या संघाचे उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमारच्या हाती देण्यात आले आहे. श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर भारतीय संघाचा सांघिक फोटो शेअर केला आहे.
All SET! 💙
Sri Lanka bound 🇱🇰✈️#TeamIndia 🇮🇳 #SLvIND pic.twitter.com/eOMmiuxi28
— BCCI (@BCCI) June 28, 2021
तसेच कर्णधार शिखर धवनने देखील आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर भारतीय संघाचा विमानातील सेल्फी शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, “पुढील आव्हान श्रीलंका” असे लिहिले आहे. या सेल्फिमध्ये शिखर धवनसह कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि वरूण चक्रवर्ती देखील दिसून येत आहेत.(Watch photos shikhar dhawans led team india departs for srilanka tour for limited overs)
✈️ Next stop, Sri Lanka! pic.twitter.com/icCyBQqML7
— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 28, 2021
याबरोबरच या दौऱ्यावर जाणाऱ्या अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
Off to 🇱🇰 ✈️ pic.twitter.com/d185sMGtuC
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) June 28, 2021
https://www.instagram.com/p/CQp7LQKrNhu/
https://www.instagram.com/p/CQpwHjUlzXY/
https://www.instagram.com/p/CQp4t8Qr-SQ/
सर्व युवा खेळाडूंना संधी देणे अशक्य
भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वर्चुअल पत्रकार परिषदेत म्हटले की,”हे संभव नाही की, मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या सर्व खेळाडूंना संधी मिळेल.” संघात संधी मिळालेले खेळाडू,चांगली कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या वर्षाच्या शेवटी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. परंतु राहुल द्रविडच्या म्हणण्यानुसार सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार नाही.
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज : ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग
असे असेल भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १३ जुलै
२) दुसरा वनडे सामना – १६ जुलै
३) तिसरा वनडे सामना – १८ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २१ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २२ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २५ जुलै
महत्वाच्या बातम्या-
अर्धशतकानंतर ‘अशाप्रकारे’ मिताली राजला बाद होताना पाहून क्रिकेटप्रेमीही आश्चर्यचकित, व्हिडिओ व्हायरल
“जर देव प्रतिसाद देत नसेल तर…” पृथ्वी शॉने कसून सराव करतानाचा व्हिडिओ शेअर करत दिले हटके कॅप्शन