भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात गुरुवारी (२४ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील पहिला सामना (First T20I) पार पडला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात २ बाद १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १३७ धावांवरच गारद झाला. परिणामी भारतीय संघाने ६२ धावांच्या फरकाने हा सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान असे काही घडले जे पाहून कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याच्या चेहऱ्याचा रंग उडालेला दिसला. तर प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) यांनीही त्यांचे डोके धरले होते.
या सामन्यादरम्यान चरिथ असलांकाला पंचांनी सहाव्या षटकात पायचित बाद दिले होते. परंतु त्याने पंचांच्या या निर्णयानंतर त्याच्या सहकाऱ्यासोबत चर्चा केली आणि नंतर डीआरएस घेतला होता. यानंतर रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे दिसले आणि मैदानी पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. (Rohit And Dravid Reaction On DRS)
हा सर्व प्रकार भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्या षटकात घडला होता. तो डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने षटकातील चौथा चेंडू फेकला, ज्यावर श्रीलंकेचा फलंदाज असलांका याने स्वीर शॉट मारण्याता प्रयत्न केला. परंतु त्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला. यानंतर भारतीय खेळाडूंच्या जोरदार अपीलवर मैदानी पंचांनी असलांका पायचित करार केले.
मात्र असलांकाला पंचांच्या निर्णयाबद्दल शंका होती. त्यामुळे त्याने त्याचा साथीदार जेनिशसोबत आपल्या विकेटबद्दल चर्चा केली आणि डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही चेंडू बॅटला स्पर्श करून गेला की नाही, याबाबत साशंक होते. तरीही त्यांनी डीआरएससाठी अपील केली होती.
https://twitter.com/BenaamBaadshah4/status/1497118135278661634?s=20&t=6KyCxEM4nCu5kDhZEK3P4A
पुढे जेव्हा टिव्ही पंचांनी रिप्लेमध्ये असलांकाची विकेट तपासली, तेव्हा चेंडू त्याच्या बॅटला कडेला लागून गेला असल्याचे दिसले. परिणामी मैदानी पंचांना त्यांचा निर्णय बदलून असलांकाला नाबाद करार करावे लागले. मात्र भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना या निर्णयाची अपेक्षा होती. त्यामुळे पंचांनी त्यांचा निर्णय माघारी घेताच कर्णधार रोहित आश्चर्याने हसू लागला. तर दुसरीकडे पंच द्रविड यांनी डोक्यावर हात मारत निराशा व्यक्त केली होती. त्यांच्या या प्रतिक्रिया कॅमेरात कैद झाल्या असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे ईशान किशनने गाजवलं लखनऊचं मैदान; वाचा काय होता तो सल्ला
घरच्या मैदानावर रोहितच आहे टी२०चा किंग, फलंदाजीनंतर नेतृत्त्वातही बनला ‘नंबर १’