---Advertisement---

Video: गोलंदाज चाहरच्या खणखणीत षटाकाराने ‘सिक्सर किंग’ रोहितचंही जिंकल हृदय, ठोकला भारी सॅल्यूट

On: रविवार, नोव्हेंबर 21, 2021 11:19 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात नुकतीच पार पडलेली ३ सामन्यांची टी२० मालिका यजमानांसाठी अतिशय शानदार राहिली. भारतीय संघाने या मालिकेत अभेद्य कामगिरी करत पाहुण्या न्यूझीलंडला ३-० ने व्हाईटवॉश दिला. रविवार रोजी (२१ नोव्हेंबर) कोलकाता येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात ७३ धावांनी सोपा विजय मिळवत भारताने टी२० मालिकेत न्यूझीलंडवर शुभ्रधवल यश मिळवले आहे.

भारतीय संघाच्या या सामना विजयात वेगवान गोलंदाज दिपक चाहर याचा मोलाचा वाटा राहिला. गोलंदाजीत जास्त विशेष कामगिरी न करू शकलेल्या चाहरने या सामन्यात फलंदाजीत मात्र बहुमूल्य योगदान दिले. आपल्या झंझावती खेळीदरम्यान त्याने एक लक्षवेधी असा षटकार ठोकला, ज्याचे कौतुक खुद्द ‘सिक्सर किंग’ रोहित शर्मा याने केले.

कर्णधार रोहितने सलामीला फलंदाजीला येत ५६ धावांची आकर्षक खेळी केली होती. तो बाद झाल्यानंतर इतर फलंदाज मोठ्या खेळी करण्यात अपयशी ठरले. १६ षटकात १४० धावांवरच अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर भारतीय संघ जास्तीत जास्त १६० धावांपर्यंत मजल मारू शकेल अशी लक्षणे दिसत होती. परंतु चाहरने संघाला अनपेक्षित असा शेवट करुन दिला.

नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत चाहरने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. न्यूझीलंडच्या एकाहून एक सरस गोलंदाजाला त्याने चांगलाच चोप दिला. केवळ ८ चेंडूंचा सामना करताना त्याने नाबाद २१ धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याने २ चौकारांसह १ खणखणीत असा षटकारही टोलवला.

https://twitter.com/4sacinom/status/1462440596170231813?s=20

डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या ऍडम मिल्नेची चाहरने सळो की पळो करुन सोडली. त्याने त्याच्या षटकातील सुरुवातीच्या २ चेंडूंवरच सलग २ चौकार खेचले. त्यानंतर त्याच्याच षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने मीड ओव्हर विकेटवर मोठा षटकार ठोकला. त्याच्या या षटकाराला पाहून ड्रेसिंग रूममध्ये बसलेला रोहितही प्रभावित झाला. त्याने ड्रेसिंग रूममधून चाहरला कडक सॅल्यूट ठोकत त्याच्या फलंदाजीची प्रशंसा केली.

रोहितचा चाहरला अशाप्रकारे शाबासकी देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीचा ठरतोय.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित-ईडन गार्डन्सचे ‘अजोड’ नाते तुफानी अर्धशतकाने झाले आणखीन वृद्धिंगत

‘हिटमॅन’चं विश्वविक्रमी अर्धशतक! विराटला मागे टाकत ‘या’ यादीत रोहित पहिल्या क्रमांकावर विराजमान

माईलस्टोन अलर्ट! भारताच्या युझवेंद्र चहलसाठी कोलकाता टी२० राहिली विक्रमी, केला ‘हा’ खास किर्तीमान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---