---Advertisement---

‘हे तोपर्यंत संपणार नाही’, शिखर धवनने नवा लूक आणि खास कॅप्शनसह शेअर केला खास व्हिडिओ

Shikhar-Dhavan-Viral-video
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि अनेकदा त्याच्या चाहत्यांसाठी मजेदार रील शेअर करतो. बर्‍याच वेळा त्याचे व्हिडिओ आनंदी असतात आणि बर्‍याच वेळा तो आपल्या व्हिडिओंद्वारे युवा खेळाडूंना प्रोत्साहन देताना देखील दिसतो. दरम्यान, त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ‘गब्बर’ म्हणजेच धवन एका नव्या लूकमध्ये दिसत आहे.

रविवारी, (14 जानेवारी) रोजी स्टायलिश डावखुरा फलंदाजाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये धवन त्याच्या बदललेल्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यादरम्यान तो व्हिडिओमध्ये म्हणाला, “जर मी सर्व काही गमावले, तरीही मी माझ्याकडे आहे. सर्वकाही पुन्हा सुरू करण्यासाठी हे पुरेसे आहे. तो पर्यंत हे संपणार नाही जो पर्यंंत मी जिंकणार नाही.” (watch shikhar dhawan shared video of his new look with special caption)

शिखर धवनने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “मी आव्हानांवर मात करतो, ते माझ्या यशाला चालना देतात.”

37 वर्षीय धवनचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून त्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. भारतीय संघाचा अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहल याने लिहिले, “नाइस हेअर कट भैया.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

धवन बराच काळ राष्ट्रीय संघातून बाहेर असून त्याच्या पुनरागमनाच्या आशा खूप कमी आहेत. डिसेंबर 2022 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि तेव्हापासून तो बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत शुबमन गिल (Shubman Gill) याला रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्यासोबत सलामीची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने करत आपले स्थान पक्के केले.

शिखरने आयपीएल 2023 मध्ये शेवटचा सामना खेळला होता आणि आता तो फक्त आयपीएल 2024 मध्येच ऍक्शन करताना दिसणार आहे. पंजाब किंग्जने 17 व्या मोसमासाठी त्याला कायम ठेवले असून डाव्या हाताच्या फलंदाजाने आगामी मोसमासाठी सराव सुरू केला आहे. (It won’t end till then Shikhar Dhawan shared a special video with a new look and a special caption)

हेही वाचा

‘आता धाकट्याची वेळ’, मोहम्मद शमीच्या भावाची झंझावाती गोलंदाजी; रणजी सामन्यात केला कहर
IND vs AFG: ‘पहिले कोहलीचे पाय धरले, नंतर मिठी मारली’, इंदूर मैदानात घुसलेल्या चाहत्याचं पुढे काय झालं पाहा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---