संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेत भारताची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक होत आहे. या स्पर्धेत भारताने लागोपाठ दोन सामने गमावले आहेत. यामुळे संघाची आणि चाहत्यांंची खूपच निराशा झाली आहे. केएल राहुल हा सलग तिसऱ्या सामन्यांत धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. यावेळी संघाबाहेर असलेल्या एका फलंदाजांने संघपुनरागमनाची चांगलीच तयारी सुरू केली आहे. यासाठी त्याचा कसून सराव सुरू आहे.
भारतीय संघाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने संघात परतण्याची तयारी सुरू केली आहे. त्याने फलंदाजीचा सराव केला असून त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो जबरदस्त शॉट्स खेळताना दिसत आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाने यावर्षी टी20मध्ये चांगली कामगिरी केली असली तरी त्याला आशिया चषकासाठी संघात जागा मिळाली नाही. त्याला राखीव खेळाडूमध्ये ठेवण्यात आले. राखीव खेळाडूंमध्ये अक्षर पटेल आणि दीपक चाहर यांचा समावेश आहे. या दोघांना भारतीय संघात समाविष्ट केले आहे.
श्रेयस हा यावर्षी भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 14 सामन्यांत 44.90च्या सरासरीने 449 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. एवढी चांगली कामगिरी करूनसुद्धा त्याला आशिया चषकामध्ये 15 जणांच्या संघात जागा मिळाली नाही. याचे प्रमुख कारण तो आखूड चेंडूंचा सामना करताना सर्वाधिकवेळा बाद झाला आहे.
https://www.instagram.com/reel/CiM4oo6pV5o/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएल 2022च्या हंगामामध्ये श्रेयस सतत आखूड चेंडूवर चांगला शॉट खेळताना विकेट्स गमावताना दिसला आहे. शॉट सिलेक्शनचा प्रभाव त्याच्या पुढील कामगिरीवरही झाला आहे. यामुळेच त्याची आशिया चषकात निवड झाली नसावी. सध्या त्याची संघात येण्याची आशा आहे. कारण भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रीका विरुद्ध तीन-तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“वर्ल्डकपमध्ये हाच संघ खेळणार”; रोहितने दिले संघनिवडीबाबत रोखठोक उत्तर
भारत हरला तरीही रोहित अव्वलच! सचिनला मागे टाकत ठरलाय ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
भारताच्या आशा जागृत ठेवणारी अफगाणिस्तान करणार पहिली फलंदाजी, वाचा प्लेइंग 11