भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या कसोटी सामन्याला १५ जानेवारीपासून बिर्स्बेनच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल फलंदाजीला उतरला तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. या सामन्यात शुबमन चक्क स्टिकर नसलेल्या बॅटसह फलंदाजी करायला आला. अनेकांना ही घटना पाहून आश्चर्य वाटले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळी फलंदाज आपल्या बॅटसह खेळायला येतात, त्यावेळी बहुतेक सगळ्यांच्याच बॅटवर स्टिकर असते. त्या खेळाडूला प्रायोजकत्व देणाऱ्या कंपनीचा लोगो असलेले स्टिकर खेळाडूंच्या बॅटवर असते. मात्र शुबमनच्या बॅटवर स्टिकर नसल्याचे पाहून सगळेच गोंधळात पडले.
मात्र आता त्यामागील कारण समोर आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत हे कारण सांगितले आहे. या ट्विटनुसार सिडनीत ज्यावेळी शुबमन फलंदाजी करत होता, त्यावेळी त्याच्या बॅटवरील स्टिकर निघाले होते. आणि ब्रिस्बेन कसोटीत त्याने तीच बॅट वापरल्याने त्यावर स्टिकर नव्हते.
Shubman left his stickers in Sydney #AUSvIND https://t.co/f7B010IhhP pic.twitter.com/4TJGPxYGUo
— cricket.com.au (@cricketcomau) January 16, 2021
दरम्यान, या मालिकेतील दुसऱ्या सामन्याद्वारे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या शुबमनने आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. पहिल्याच कसोटीत ४५ आणि नाबाद ३६ अशी धावसंख्या त्याने उभारली. तर दुसऱ्या कसोटीत त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकाविले. मात्र ब्रिस्बेन कसोटीत तो अपयशी ठरला. या कसोटीतील पहिल्या डावात शुबमन पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर ७ धावा झाल्या असताना बाद झाला. मात्र या कसोटीचा दुसरा डाव बाकी असून शुबमनकडून दुसऱ्या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा भारतीय संघाला असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs SA : कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा २० जणांचा संघ जाहीर; तब्बल ८ खेळाडूंना डच्चू