---Advertisement---

अश्विन ते सूर्यकुमार, तांत्रिक अडचणीमुळे खाली आलेल्या स्पायडर कॅमेरापुढे भारतीय खेळाडूंची ‘फुल टू मस्ती’

On: रविवार, डिसेंबर 5, 2021 6:22 PM
---Advertisement---

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. परंतु याच क्रिकेट या खेळात चक्क एका कॅमेरामुळे अडथळा निर्माण झाल्याचे फार क्वचितच पाहायला मिळते. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबई येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. स्पायडर कॅमेरामुळे या सामन्याच्या तिसऱ्या दिवसातील (०५ नोव्हेंबर) दुसरे सत्र लवकरच संपवण्यात आले. हा सर्व प्रकार घडत असताना भारतीय खेळाडूंनी मात्र भरपूर मस्ती केली, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

त्याचे झाले असे की, तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रादरम्यान ७ विकेट्स २७६ धावा अशा स्थितीत असताना भारतीय संघाने त्यांचा डाव घोषित केला. परिणामी न्यूझीलंडला शेवटच्या षटकात विजयासाठी ५४० धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने त्यांचा प्रभारी कर्णधार टॉम लॅथम याची विकेट गमावली होती. लॅथम ६ धावांवर आर अश्विनचा बळी ठरला होता.

यानंतर अचानकच भर मैदानात स्पायडर कॅमेरा त्याच्या निश्चित जागेपासून खाली आला. तांत्रिक अडचणीमुळे हा कॅमेरा खाली आला होता. त्यामुळे क्षेत्ररक्षण करत असलेल्या भारतीय खेळाडूंसह पंचांनीही धीराने स्पायडर कॅमेराचे सामान्य कार्य पुन्हा सुरू होण्याची आणि ते सुरक्षित अंतरापर्यंत उडण्याची वाट पाहिली. परंतु टी ब्रेकपर्यंत ही तांत्रिक अडचण कायम राहिली.

यादरम्यानच्या वेळेत भारतीय खेळाडूंनी मात्र सामना दर्शकांचे भरपूर मनोरंजन केले. श्रेयस अय्यर, श्रीकर भरत, मोहम्मद सिराज या कॅमेराजवळ जाऊन एकटक त्याच्याकडे पाहताना दिसले. श्रेयसने आपला हात कॅमेराला लावत त्याला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर गोलंदाज आर अश्विन कॅमेरापुढे येऊन खदखदून हसत मस्ती करताना दिसला. तसेच त्याने कॅमेराखाली उभा राहून जणू त्याचे वजनही तपासल्याची कृती केली आहे.

https://twitter.com/Iamfmk1/status/1467416159230173184?s=20

याबरोबरच सूर्यकुमार यादवही नवलाने कॅमेराकडे बघताना दिसला. कर्णधार विराट कोहलीनेही या कॅमेरापुढे येत जणू तू इथे काय करतोय, अशा प्रकारचे इशारे केले. या सर्व प्रकारामुळे सामना दर्शकांचे मात्र भरपूर मनोरंजन झाले. बीसीसीआयने या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला असून चाहते व्हिडिओ पाहून लोटपोट होताना दिसत आहेत. अनेकांनी प्रतिक्रियांद्वारे हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दुसरीकडे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून न्यूझीलंड संघ ५ बाद १४० धावा अशा स्थितीत आहे. भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा आणखी ४०० धावांनी आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शुबमन गिलने क्लासिक चौकार मारताच, मैदानात घुमला ‘सचिन…सचिन…’ आवाज; पाहा व्हिडिओ

“मला सिराजमध्ये मॅकग्राची झलक दिसते”; वरिष्ठ भारतीय खेळाडूने गायले गुणगान

पहिल्यांदाच असं घडलंय! अगरवाल, गिल, पुजाराने भारतासाठी फक्त सलामीच दिली नाही, तर मोठा कारनामाही केलाय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---