भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघासमोर ५४० धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात शुबमन गिल सलामी फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. पण यादरम्यान त्याला पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आठवण आल्याचे दिसून आले.
सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच मुंबईतील वानखेडे स्टेडियम हे त्याचे घरचे मैदान आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा वानखेडेच्या मैदानावर सामना होतो. त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना सचिन तेंडूलकरची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
दरम्यान, जेव्हा शुबमन गिलने टीम साउदीच्या गोलंदाजीवर चौकार मारला त्यावेळी मैदानावर ‘सचिन… सचिन’चा गजर व्हायला सुरुवात झाली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तसेच काही युजर्स याचा संबंध सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोबत देखील जोडत आहेत. कारण, काही दिवसांपूर्वी शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा झाली होती. मात्र, या दोघांकडून याबद्दल कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आले नव्हते. तसेच शुबमनने तो अद्याप सिंगल असल्याचे सोशल मीडियाच्या मार्फत स्पष्ट केले होते.
शुबमन गिलबद्दल बोलायचं झालं, तर मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ४४ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्याला ४७ धावा करण्यात यश आले होते.
https://twitter.com/addicric/status/1467373737745862658?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1467373737745862658%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-8287762961477192795.ampproject.net%2F2111152338002%2Fframe.html
पहिल्या डावात भारतीय संघाने उभारला ३२५ धावांचा डोंगर
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२५ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून मयांक अगरवालने सर्वाधिक १५० धावांची खेळी केली होती. तर अक्षर पटेलने ५२ आणि शुबमन गिलने ४४ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली होती. तर न्यूझीलंड संघाकडून एकट्या एजाज पटेलने १० गडी बाद केले होते.
भारतीय गोलंदाजी समोर किवी फलंदाजांनी टाकल्या नांग्या
भारतीय संघाने दिलेल्या ३२५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंड संघाचा संपूर्ण पहिला डाव अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड संघाकडून काईल जेमिसनने सर्वाधिक १७ धावा केल्या. तर टॉम लेथमने १० धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने सर्वाधिक ४, तर मोहम्मद सिराजने ३ गडी बाद केले.
भारतीय संघाने दिले ५४० धावांचे आव्हान
भारतीय संघातील फलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मयांक अगरवालने ६२ धावांची खेळी केली. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी ४७ धावांची खेळी केली. भारतीय संघाने दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित केला. न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यासाठी ५४० धावांची आवश्यकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वूSSS! पावसाचे पाणी साचलेल्या मैदानावर शाकिबने अशी केली मस्ती, पाहून तुम्हालाही आठवेल बालपण
कोण आहे भारताशी खास नाते असलेला किवी फिरकीपटू ‘एजाज पटेल’, कशी आहे त्याची कसोटी कारकीर्द?